मूर्तिजापूर (Murtijapur Crime) : स्थानिक जुनी वस्ती भगतसिंग चौकात असलेल्या वाइन शॉपचा मालक ७ मेच्या रात्री आपले प्रतिष्ठान बंद करून घरी जात असता अज्ञात २० ते २५ वयोगटातील चार युवकांनी (Murtijapur Crime) मूर्तिजापूर शाळेजवळ रात्री १ वाजता व्यावसायिकाची दुचाकी अडविली. त्यांना काठीने मारहाण करून १ लाख ४५ हजारांची रोख असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली.
माहितीनुसार, गुप्ता वाइन शॉपचे प्रोप्रा राजेश गुप्ता (४४) रा. शिवाजी नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपले गुप्ता वाइन शॉप ७ मेच्या रात्री बंद करून दुकानातील रोख रक्कम १ लाख २३ हजार ५०० रूपये बॅगेत ठेवून बाजूलाच असलेल्या मोठ्या भावाच्या सारिका वाइन शॉप दुकानात बसून मो’्या भावाने सुद्धा दिलेली रोख २१ हजार ५०० रूपये त्याच बॅगेत ठेवून आपल्या माणसासोबत दुचाकीने १ लाख ४५ हजार रोख असलेली बॅग घेऊन शिवाजी नगर येथे घराकडे जात होते. (Murtijapur School) मूर्तिजापूर शाळेजवळ मागून येणार्या दुचाकीस्वारांनी हाक मारीत थांबवित त्यांच्या दुचाकीजवळ पोहचून तिला लाथ मारून गाडीसह फिर्यादीस खाली पाडले.
तसेच काठीने मारहाण करीत जखमी करून त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम १ लाख ४५ हजारांची बॅग हिसकावून पळ काढला. या फिर्यादीवरून अज्ञात २० ते २५ वयोगटातील चार युवकांविरूद्ध सिटी पोलिस ठाण्यात कलम ३९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास (Murtijapur police) ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वडतकर करीत आहेत.