मूर्तिजापूर (Murtijapur Crime) : स्थानिक जुनी वस्ती भगतसिंग चौकात असलेल्या (Wine shop) वाइन शॉपचा मालक ७ मेच्या रात्री प्रतिष्ठान बंद करून घरी जात होता. यावेळी अज्ञात २० ते २५ वयोगटातील चार युवकांनी मूर्तिजापूर शाळेजवळ रात्री १ वाजेदरम्यान व्यावसायिकाची मोटारसायकल थांबवून त्यास काठीने मारहाण करून १ लाख ४५ हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केली होती. या घटनेचा कोणताच सुगावा नसतानाही एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात (Murtijapur police) पोलिसांना अखेर यश आले आहे. घटनेतील इतर आरोपीसुद्धा लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याचे माहिती सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी दिली आहे.
वाइनशॉप मालकास लूटमार प्रकरण
गुप्ता वाइन शॉपचे (Wine shop) प्रोप्रा राजेश गुप्ता (४४) रा. शिवाजी नगर यांनी दिलेल्या (Murtijapur Crime) फिर्यादीनुसार, ते आपल्या गुप्ता वाइन शॉपमधील रोख १ लाख २३ हजार ५०० रूपये व मो’्या भावाच्या सारिका वाइन शॉपमधून २१ हजार ५०० रूपये बॅगेत ठेवून आपल्या माणसासोबत मोटारसायकलने ७ मेच्या रात्री घराकडे जात होते. यावेळी अज्ञात भामट्यांनी त्यांची गाडी अडवून व काठीने मारहाण करीत त्यांच्याजवळी रोकड असलेली बॅग लंपास केली.
घटनेचा कोणताच सुगावा नसताना आरोपीस अटक
या घटनेचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले होते. सदर प्रकरणी (Murtijapur police) सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत वडतकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, हेड पोलिस कॉन्स्टेबल सुरेश पांडे, सचिन दांदले, मंगेश विलेकर, पोलिस कॉन्स्टेबल सचिन दुबे, स्वप्निल खाडे, गजानन खेडकर, भूषण नेमाडे यांनी सापळा रचून घटनेतील आरोपी विशाल बाबुलाल राऊत (२०) रा. थिलोरी ता. दर्यापूर यास अटक केली. त्यास पोलिसी हिसका दाखविताच त्याने सहा ते सात साथीदारच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. (Murtijapur Crime) घटनेतील पसार असलेले इतर आरोपीसुद्धा लवकरच गजाआड करण्यात येईल, असे मत पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी व्यक्त केले. (Murtijapur police) सिटी पोलिस ‘ाण्यात सदर प्रकरणी कलम ३९४, ३४ भादंविनुसार अज्ञात पाच ते सहा आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वडतकर करीत आहेत.