मूर्तिजापूर (Murtijapur Crime) : स्थानिक जुनी वस्ती भगतसिंग चौकात असलेल्या वाइन शॉपचे संचालक राजेश गुप्ता हे ७ मेच्या रात्री प्रतिष्ठान बंद करून घरी जात असता अज्ञात युवकांनी मूर्तिजापूर शाळेजवळ रात्री १ वाजेदरम्यान त्यांची दुचाकी अडविली. यावेळी व्यावसायिकास काठीने मारहाण (Murtijapur Crime )करून त्यांच्याजवळील १ लाख ४५ हजार रूपये असलेली बॅग लंपास केली होती. या घटनेतील मुख्य आरोपीसह सहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणरून मुद्देमालासह रविवारी गजाआड करण्यात आले, अशी माहिती १७ जून रोजी देण्यात आली. विशेष म्हणजे (murtizapur Police) सिटी पोलिसांनी दोन लुटमारीच्या घटनेचा छडा लावला आहे.
सिटी पोलिसांनी दुसर्या घटनेचाही लावला छडा
या प्रकरणी गुप्ता वाइन शॉपचे संचालक राजेश गुप्ता (४४) रा. शिवाजी नगर यांनी फिर्याद दिली होती. सदर प्रकरणी (murtizapur Police) पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व (murtizapur Police) सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांना मिळालेला गुप्त माहितीवरुन (murtizapur Police) सिटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत वडतकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, तायडे, हेड पोलिस कॉन्स्टेबल सुरेश पांडे, सचिन दांदले, मंगेश विलेकर, पोलिस कॉन्स्टेबल सचिन दुबे, स्वप्निल खाडे, गजानन खेडकर, भूषण नेमाडे यांनी सापळा रचून घटनेतील मुख्य आरोपी विशाल बाबूलाल राऊत (२०) रा. थिलोरी ता. दर्यापूर यास अटक करून त्यास पोलिसी हिसका दाखविताच त्याने त्याच्या इतर साथीदारांची नावे सांगितली.
व्यावसायिक घरी जात असता लुटमार
त्यावरून (murtizapur Police) सिटी पोलिसांनी यश नंदकिशोर नानीर (२०) रा. गौतमनगर मूर्तिजापूर, महेश सुधाकर गवई (२२) रा. घरकुल मूर्तिजापूर, सौरभ शशिकांत बालापुरे (२१) रा. काळा गोटा मूर्तिजापूर व अमरदीप राजेंद्र मोहोड (२२) रा. पहाडीपुरा मूर्तिजापूर या आरोपींना अटक केली. तसेच यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. यावेळी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच २७ डीपी ८२६२) किंमत १ लाख २० हजार, दुचाकी (एमएच ३० एएच ६३९५) किंमत ३६ हजार, मोबाइल किंमत २१ हजार व रोख २० हजार, असा एकूण १ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सिटी पोलिस ‘ाण्यात सदर प्रकरणी कलम ३९४, ३४ भादंवि नुसार पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली (murtizapur Police) सहायक पोलिस निरीक्षक वडतकर करीत आहेत.
दुसर्या व्यावसायिकास अडविण्याचा आखला होता डाव
घटनेतील मुख्य आरोपी विशाल राऊत हा काही महिन्यापूर्वी येथील एका दुध डेअरीवर आ’ दिवस काम करून त्याच व्यावसायिकाला लुटण्याचा डाव आखला होता. मात्र सदैवाने त्या दिवशी सदर व्यावसायिकाचा डाव फसल्याने सर्व आरोपी राजेश गुप्ता यांच्या वाइन शॉपमध्ये दारू पिण्याकरिता गेले होते. त्यांना सदर व्यवसायी रोख मोजताना दिसताच तेथे दारू पिवून बाहेर त्याची वाट पाहत त्यालाच रस्त्यात अडवून त्याच्या रोख रकमेवर डाव साधल्याचेसुद्धा आरोपीने गुन्ह्याची कबुली देताना सांगितले.