येणेगूर (Murum Mod Shiv Sena) : मध्य प्रदेशातील विधानसभा सदस्यांचा सायकल यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील मुरूम मोड येथे (Murum Mod Shiv Sena) शिवसेनेच्या वतीने सत्कार करून पुढील यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मध्यप्रदेश येथील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार मोंटू सोलंकी मतदारसंघातील लोकांसह सर्वांना सुख, समृद्धी व विकासासाठी चाचरिया (मध्य प्रदेश) ते तिरुपती बालाजी पर्यंत सायकल यात्रा करीत असताना मुरूम मोड येथे आज त्यांचा व त्यांच्यासोबत असणाऱ्या राजकला मोंटू सोलंकी जिल्हा पंचायत सदस्य बडवाणी मध्य भायलाल डावर , गीता डावर, तारासिंह सोलंकी, राहुल सोलंकी, गनमॅन दर्यावसिंह सोलंकी गनमॅन शैलेंद्र पवार यांचा (Shiv Sena) शिवसेनेच्या वतीने यतोचित सत्कार करून पुढील सायकल यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशांत पोचापुरे, विलास राठोड, निळकंठ लामजणे, किशोर रामतीर्थ, सागर घोरपडे, प्रवीण दुधभाते व शिवसैनिक उपस्थित होते.