अंतर्गत वाढ होत असल्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे?
पुसद (Pusad Crime) : पुसद तालुक्यासह शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय व निम शासकीय बांधकामे होत आहेत. तर सध्या रेती उत्खनन बंद आहे. मात्र शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिलाबाद, माहूर, नांदेड, महागाव, फुलसावंगी, आर्णी, दहिसावळी यासह पुसद तालुक्यातील नदी नाल्यातून सर्रास, डोंगरदऱ्यातून मुरमाचे व रेतीचे अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात बांधकाम बाजारपेठेमध्ये चढ्या दराने विकल्या जात आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या (Pusad Crime) व्यवसायामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांसह गुन्हेगारी क्षेत्रातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश झाल्यामुळे स्पर्धा यांच्यामध्येच वाढल्यामुळे अंतर्गत वादासह मारामारीच्या घटनाही घडत आहेत. तर यामुळे मात्र सामाजिक सलोखा बिघडून एखादा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासन हे रोखण्यात अपयशी ठरत आहे हे विशेष.
दिवसाढवळ्या शहरांमध्ये भरधाव वेगाने छोटे( डुग्गे) अवैधपणे रेतीची अंतर्गत वाहतूक करणारे काळ्या,पिवळ्या याचे वाहनचालक रस्त्याने फिरवत आहेत. यामुळे मात्र रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. यांना जिल्हा खलीकर्म अधिकारी, अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना बहाल केला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Pusad Crime) सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारे या अवैध मुरूम गिट्टी रेती चा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना शासन रोखणार का? तर यामुळे शासनाचा महसुली मोठ्या प्रमाणात बुडत आहे.
अंतर्गत वादामुळे सामाजिक सलोखा बिघडून एकमेकांचे खून पडण्यापेक्षा प्रशासनाने आता तरी जागृत होणे गरजेचे आहे. तर लोकप्रतिनिधींनी ही आपली जबाबदारी निभावणे गरजेचे आहे हे विशेष. 11 डिसेंबर रोजी पुसद शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथक यांच्या माध्यमातून अवैधपणे रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारी दोन वाहने जप्त करून ताब्यात घेण्यात आली होती. मात्र त्यातलं एक वाहन ट्रॅक्टर हे पोलीस स्टेशनच्या आवारातून गायब झालं! पोलीस प्रशासनाने मात्र या कारवाईची माहिती दैनिक देशोन्नतीला शेवटपर्यंत दिलीच नाही हे विशेष.