शिरोळ-वांजरवाडा शिवारावर निलंगा ‘महसूल’ची ‘माया’
निटूर (Nilanga Taluka) : निलंगा तालुक्यात गिरकचाळ येथे मांजरा नदीवर अंदाजे 45 कोटी रुपये खर्चून अद्ययावत तंत्रज्ञानाने उभारल्या जात असलेल्या पुलासाठी निलंगा तालुक्यातील शिरोळ-वांजरवाडा शिवारातून शुक्रवारी सकाळी बिनदिक्कत मुरूम उपसा चालू होता; मात्र ‘देशोन्नती’च्या वृत्ताचा बोभाटा झाल्याने तासाभरानंतर हा मुरूम उपसा थांबविण्यात आला. दरम्यान आजपर्यंत बेकायदेशीररित्या व अवैध पद्धतीने किती (Nilanga Taluka) मुरूम उपसा झाला, याबाबत महसूल प्रशासनाचे अद्याप कानावरच हात आहेत.
‘शिरोळ वांजरवाडा शिवारात बिनदिक्कत मुरूम उपसा’, असे वृत्त देशोन्नतीने शुक्रवारी (दि.17) च्या अंकात दिले होते. या (Nilanga Taluka) वृत्ताची दखल महसूल प्रशासनाने अद्यापही घेतली गेल्याचे स्पष्ट झाले नाही. नेहमीप्रमाणे दररोज पोकलेन लावून मोठ्या हायवांद्वारे राजरोस मुरूम उपसा केला जात होता. याबाबत महसूल प्रशासन किंवा प्रशासनातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडे कुठलीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदारांना याबाबत विचारले असता त्यांनी मंडल अधिकाऱ्यांना विचारा ते माहिती देतील, असे सांगितले तर मंडल अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईलही उचलला नाही. दरम्यान याप्रकरणी तलाठ्यांना विचारण्यासाठी फोन केला असता तलाठ्यांनी सविस्तर माहिती देऊ, असे सांगून बोलणे टाळले.
शुक्रवारी सकाळी शिरोळ शिवारात बिनदिक्कत मुरूम उपसा नेहमीप्रमाणे चालू झाला. ‘देशोन्नती’च्या बातमीची सर्वत्र चर्चा झाल्याने व बेकायदेशीरपणे मुरूम उपसा होत असल्याचा बोभाटा झाल्यानंतर अखेर तासाभरानंतर हा मुरूम उपसा थांबविला. शुक्रवारी सकाळीच एक नव्हे, तर दोन-दोन पोकलेन लावून हा मुरुम उपसा जोरदारपणे सुरू होता.
महसूल प्रशासन कारवाईचे धाडस दाखविल काय?
गिरकचाळ येथील पुलाचे काम करणाऱ्या कंपनीकडून नदीपात्रात मुरूम भरणे चालू आहे. (Nilanga Taluka) इस्टिमेटला असलेल्या खदानीतून मुरूम उचलणे अपेक्षित असताना महसूल यंत्रणेला आपल्या सोयीनुसार वाकविणाऱ्या कंत्राटदाराने राजरोसपणे केलेला मुरूम उपसा चर्चेचा ठरला आहे. सर्वसामान्य ग्रामस्थांनी घरकुलांसाठी मुरूम नेला तर त्याच्या पाठीमागे लागणारे महसूल प्रशासन अशा कंत्राटदारावर कारवाई करण्याचे धाडस दाखविल काय? असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.