तहसीलदार दिनेश झांपले यांची मध्यस्थी उपोषणास स्थगिती
सेलू (Muslim reservation) : शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ४ जुलैपासून (Muslim reservation) मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अॅड. विष्णू ढोले (Adv. Dhole) यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. शनिवार १३ जुलै उपोषणाचा दहावा दिवस संपत असताना रात्री आठ वाजता (Selu Tahsildar) तहसीलदार दिनेश झांपले ,पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या उपस्थितीत परभणी येथील बिल्डर सय्यद कादर यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन दहा दिवसापासून चाललेले आमरण उपोषण (Muslim reservation) सोडले. यावेळी नगरसेवक शेख रहीम, नगरसेवक रहीम पठाण, पालिकेचे निवृत्त कक्षा अधिकारी आयुब अमिनोदीन ,शेख महमूद, सुनील गायकवाड, सुबोध काकडे, पत्रकार मोहम्मद इलियास, पत्रकार अमोल डंबाळे,शेख साजिद, डॉ. मुताहेर पठाण, अमजद बागवान, बापू धापसे आदी सह अनेक जण उपस्थित होते.
शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात (Muslim reservation) मुस्लिम समाजाला आरक्षणासह इतर मागण्यासाठी अॅड. विष्णू ढोले हे आमरण उपोषणास बसले होते. आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी शनिवार १३जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी आणि शासन स्तरावर उपोषणकर्त्याच्या मागण्याच्या संदर्भात माहिती कळविण्याचे आश्वासन देत मागील दहा दिवसापासून चाललेले हे आमरण उपोषण सोडण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली.त्यानंतर परभणीचे प्रसिद्ध बिल्डर सय्यद कादर यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. (Muslim reservation) मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर दहा दिवस आमरण उपोषण करणाऱ्या अॅड. विष्णू ढोले (Adv. Dhole) सह त्यांच्या सर्व पदाधिकारी यांचे यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महम्मद इलियास यांनी आभार व्यक्त केले.