उपोषण पाचव्य दिवसी देखील सुरूच
सेलू (Muslim reservation) : मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची (Muslim reservation) तात्काळ अमंलबजावणी करण्यासह इतरही मागण्यासाठी अँड विष्णू ढोले यांनी गूरूवार ४ जूलै रोजी पासून शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर पूतळा परिसरात अमरण उपोषण सूरू केले असून सोमवार ८जुलै उपोषणाचा पाचवा दिवस असून देखील प्रशासकीय पातळीवर अद्यापही कूठल्याही प्रकारच्या हलचाली होत नसल्याने बूधवार १० जुलै रोजी सेलू बंद ची हाक देण्यात आली आहे. अँड विष्णू ढोले यांनी मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजाला पुर्ण आरक्षण (Muslim reservation) मिळेपर्यंत अंतरीम रित्या जुलै २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजास दिलेले ५टक्के आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात माननिय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पुर्नस्थापित करण्यात यावे, महाज्योती, सारथी, बार्टिच्या धर्तीवर मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टिची ( मौलाना आझाद रिसर्च & ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात यावी.
मुस्लिम समाजाला आरक्षण (Muslim reservation) मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणीक फी मध्ये ५०टक्के सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरु करावी,मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा,प्रत्येक तालूक्याच्या ठिकाणी उर्दु घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे, न्यायमुर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती,महेमुद -ऊर्ररहेमान समीती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या (Muslim reservation) सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यासाठी अमरण उपोषण करण्यात येत आहे.
विविध पक्ष व सामाजिक संघटनांचा पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार गट),राष्ट्रीय काँग्रेस , मूस्लीम यूथ फोरम,अलफला एज्यूकेशन सोसयटी,एमआयएम,बेलदार सेवा मंडळ, एसडिपीआय, सिपीआय, आरपीआय, शेतकरी कामगार पक्ष आदी पक्ष संघटना व सामाजिक संघटनांनी अमरण उपोषणास पाठींबा दर्शविला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी सेलू शहरातील नागरिक मागणी करत आहेत.