परभणी (Muslim Samaj Reservation) : मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी १ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेले साखळी उपोषण सुरुच आहे. आंदोलनाला पन्नास दिवस पूर्ण झाले असून अद्याप आंदोलनाकडे शासनाचे लक्ष गेलेले नाही.
सकल मुस्लीम समाज आरक्षण (Muslim Samaj Reservation) कृती समितीतर्फे मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकर्यांमध्ये पाच टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला दररोज विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मुस्लीम समाज बांधव हजेरी लावत आहेत. मागील पन्नास दिवसांपासून सदरचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मौलाना जहांगीर नदवी, मौलाना जहीर अब्बास खासमी, जाफर खान मुसा खान, अॅड. इम्तीयाज खान, मुदस्सीर असरार, सय्यद सगीर, मो. ईलियास, शेख अखिल, हाफेज मुन्तजीब खान, मौलाना खुद्दुस मिल्ली, सय्यद अफरोज, खाजा अशरफोद्दिन, यासीन इनामदार, शेख इमरान, मोहम्मद इसा व सकल मुस्लीम समाज बांधव (Muslim Samaj Reservation) परिश्रम घेत आहेत.