परभणी/गंगाखेड (Muslim Samaj) : धर्म गुरूबद्दल तथ्यहिन असे वक्तव्य करत अपशब्द वापरून मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावत समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी गंगाखेड येथील (Muslim Samaj) मुस्लिम समाज बांधव व तरुणांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
राज्यातील काही समाज विघातकी लोक आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी मुस्लिम समाजाबद्दल तसेच धर्म गुरूबद्दल तथ्यहीन द्वेष पसरविणारे वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवित आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका गावात सुरू असलेल्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या विषयी अपशब्द वापरून बदनामी कारक वक्तव्य करत तमाम मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचे निवेदनात नमूद करून (Muslim Samaj) मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावत समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन दि. १६ ऑगस्ट रोजी नायब तहसीलदार मो. अजीम यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री यांना दिले आहे. या निवेदनावर गंगाखेड शहरातील असंख्य मुस्लिम तरुण व समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.