राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचा इशारा
लातूर (Muslim society) : राज्यामध्ये मुस्लिम समाज पुरोगामी व मागासलेला असून महिमादूर रहमान समितीच्या अहवालातून हे सिद्ध झाले आहे. (Muslim society) मुस्लिम समाजाचे मागासले पण दूर करण्यासाठी सरकारने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात मारती या संस्थेची स्थापना करावी व या संस्थेला निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा सेलच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हाधिकाऱ्यामार्फत एका निवेदनाद्वारे सोमवारी सरकारला दिला.
निवेदनात म्हटले आहे की, (Muslim society) मुस्लिम समाज हा पुरोगामी महाराष्ट्रात मागासलेला आहे. हे महेमदुर रहमान समितीच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. मुस्लिम समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु दुर्दैवाने वित्त विभागाने ते नाकारले आहे. सर्व समाजाचा समांतर विकास हे पुरोगामी महाराष्ट्राचे धोरण आहे. इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी, सारथी, महाज्योती अशा संस्था कार्य करत असताना मराठी मुसलमानावर अन्याय का? असा सवालही निवेदनात केला आहे.
अल्पसंख्यांक लातूर शहर जिल्हाध्यक्ष ॲड. आर.झेड. हाश्मी, इरफान शेख, प्रदेश महासचिव, पठाण फेरोज खान, जमील नान, शेख बरकत शेख शकील, शेख एकबाल, अबदुलभाई शेख, शेख इब्राहीम, हाफीज माजीद पटेल महेबुब अन्सारी तसेच (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.