आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांचे परभणीत प्रतिपादन!
परभणी/सेलू (Muslim tribal community) : महाराष्ट्रात विविध भागात घडणा-या घटनांचा अभ्यास केला तर मुस्लिम आदिवासी समाजाचे अस्तित्वच सध्याची परिस्थिती पाहता धोक्यात आले आहे. आजही आमची अवस्था जनावरांसारखी झाली आहे. येवला ,सातारा अमरावती येथील अन्यायकारक घटना पाहता दलित (Muslim tribal community) मूस्लिम व अदिवासी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यामूळे राज्यातील कायदा वसूव्यस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, अशी प्रखड प्रतिक्रिया आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार (Deepak Kedar) यांनी शासकीय विश्रामगृह सेलु येथे आयोजीत एका पत्रकार परिषदेत बूधवार १० जूलै रोजी बोलतांना व्यक्त केली आहे. यावेळी सुबोध काकडे, विनोद मोळे, अशोक पाटील, कूणाल इंगळे, निवृती वाघमारे, रोहन आकात, विनोद धापसे आदिसह इतर उपस्थीती होते.
पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,संविधान बचाव या सामूहिक सकारात्मक भूमिकेतून आम्ही लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीसोबत राहून काम केले.त्यानंतर आँल इंडिया पँथर सेनेचे विनोद मोळे यांनी महाविकास आघाडीमधील प्रमूख पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची औंरगाबाद येथे भेट घेतली भेटी दरम्यान पँथर सेनेला आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीत सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. त्यामूळे (All India Panther Sena) आँल इंडिया पँथर सेनेसाठी विधानसभा निवडणूकीत पाच जगांची मागणी करण्यात आली आहे यात आरक्षीत मतदार संघासह (Muslim tribal community) मूस्लीम दलित बहूसंख्ये मतदार असलेल्या मतदारासंघाची चाचपणी व पाहणी करण्याचे काम सूरू आहे. त्यामूळे महाविकास आघाडी आँल इंडिया पँथर सेनेला सोबत घेवून सामोरे जाईल असा आत्मविश्वास दिपक भाई केदार (Deepak Kedar) यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला आहे.