हजारो भाविकांनी घेतले सोहंमनाथांचे दर्शन
मानोरा (Nag Panchami) : पुरण पोळीच्या नवसाला पावणारा श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथील भगवान शिव शंकराचे शिष्य महान तपस्वी परमहंस (Shri Sohamnath Mandir) श्री सोहंमनाथ महाराज मंदिरावर दर्शनासाठी (Nag Panchami) नागपंचमी निमित्त भाविकांची मांदियाळी जमली होती. यावेळी हरहर महादेव, जय सोहंमनाथांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
हर हर महादेव, जय सोहंमनाथांचा गजर
नागपंचमी निमित्त सकाळी ७ वाजातापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरूवात केली होती. मंदीर संस्थानच्या वतीने आदल्या दिवसापासूनच भाविकांसाठी मंदीर व सभामंडप खुले केले होते. प्रत्येक भाविकांनी भगवान शिव शंकर, विठ्ठल रुक्मिणी व परमहंस (Shri Sohamnath Mandir) श्री सोहंमनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचे रांगेद्वारे दर्शन घेतले. यावेळी मनोकामना पूर्ण झालेल्या अनेक भक्तांनी भव्य दिव्य मंदिराच्या सभामंडप परीसरात पुरण पोळीचा नवस भगवान शिव शंकर व त्यांचे शिष्य सोहंमनाथांना नैवेद्य दाखवून शेकडो भक्तांनी आपला उपवास सोडविला. (Nag Panchami) नागपंचमीला श्रीक्षेत्र परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.