मानोरा (Nagar Panchayat) : पावसाळ्यात आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरल्याने व्यावसायिकासह बाजाराला येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Nagar Panchayat) नगर पंचायत प्रशासनाने आठवडी बाजार परीसरात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरात (Police Station) पोलीस स्टेशन समोर व बस स्थानकाच्या बाजूला आठवडी बाजार दर बुधवारी भरतो.
पावसाळ्यात आठवडी बाजार परीसरात पाणी साचत असल्याने सर्वत्र चिखल साचतो. चिखलात व्यावसायिक आपली सामानाची दुकाने व शेतकरी सुध्दा भाजीपाला आणून आपली दुकाने थाटतात. त्यामुळे पावसाळ्यात तालुक्यातील बाजारासाठी येणाऱ्या नागरीकांना चिखलमय भाजीपाला ताटात खाण्याची पाळी आली असुन दुकानाच्या समोरच चिखल साचत असल्याने चिखल तुडवत ग्रामीण भागातील नागरिकांना बाजार करावा लागतो. (Nagar Panchayat) नगर पंचायत प्रशासनाने आठवडी बाजार परीसरात आवश्यक सोयीसुविधा व स्वच्छ्ता राबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पावसाळ्यात आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे चिखल तुडवत नागरीकांना बाजार करावा लागतो. काही व्यावसायिक रस्त्यावर दुकाने थाटून आपला व्यवसाय करतात, तेंव्हा त्यांना (Police Station) पोलीस कर्मचारी दुकान हटविण्याची तंबी देत विनाकारण त्रास देत असल्याचे अनेक व्यावसायिकांकडून ऐकावयास येत आहे.