तळोधी/बा. (Nagbhid Police) : नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशनची (Nagbhid Police) रात्री पेट्रोलिंग करित असतांना बाळापुर येथे अवैध रेती वाहतुकीची गोपनिय माहीती मिळाली त्यानुसार कारवाई केली. सोनालीका कंपनिचे विना क्रमांकाचे, निळ्या रंगाचे सिकंदर ट्रॅक्टर व त्यास विना क्रमांकाची ट्रॉली व एक आयशर कंपनीचा सिल्व्हर रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली असे रेती या गौण खनिजाची चोरटी वाहतुक करतांना मिळुन, आल्याने ०२ ट्रॅक्टर, ट्रॉली, रेती व आरोपीतांचा मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १२,२६,०००/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध रेती वाहतूक जप्त
ट्रॅक्टर चालक नामे सुरज सुधाकर कुंभारे (२२) रा. वांद्रा ता. ब्रम्हपुरी, ट्रॅक्टर मालक नामे तोतेश्वर उर्फ बाळु अभिमन चंहादे रा. वांद्रा, आयशर कंपनीचा ट्रॅक्टरवरिल चालक नामे भाग्यवान हरिदास सातपुते (२५) रा. वांद्रा ता.ब्रम्हपुरी, ट्रॅक्टर मालक नामे गुरदेव निळकंठ वाघळे रा. वांद्रा ता. ब्रम्हपुरी यांचे विरुद्ध तळोधी पोस्टे येथे दि.२०/०५/२४ रोजी अप क्र. ८१/२४ कलम ३७९, ३४ भादवि सहकलम ३ (१)/१८१, ५०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई (Nagbhid Police) ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे,सफौ / हरिराम नैताम, पोहवा/ सिडाम, पोहवा / श्यामलाल कोंडापे यांनी केली. पुढील तपास सुरू असून ईतर आरोपींचा शोध सुरू आहे.