हिंगोली (karate competition) : येथील शांताबाई दराडे विद्यालय येथील नागेश नर्सीकर हा इयत्ता नववीचा विद्यार्थी कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. वाशीम येथे नेहरू युवा केंद्र व वाशीम जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या (karate competition) स्पर्धेत नागेश नर्सीकर (Nagesh Narsikar) या विद्यार्थ्याने १४ वर्षे वयोगट व ३५ किलो वजन गट यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक जिंकले आहे. साहित्य, कला क्रीडा आणि विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात नागेशच्या यशाने शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या (karate competition) विद्यार्थ्याला क्रीडा अध्यापक अनिल लोळेवार यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल शाळेत (Nagesh Narsikar) नागेशचा मुख्याध्यापक डॉ. प्रकाश अंभोरे यांनी शाळेच्या व संस्थेच्या वतीने सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक, उपमुख्याध्यापक जितेंद्र भट्ट, पर्यवेक्षक तुलसी चिलमूल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नागेशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.