मकर संक्रांत निमित्त हजारो भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन
औंढा नागनाथ (Makar Sankranti) : येथील आठवी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात 14 जानेवारी रोजी मंगळवारी मकर संक्रात निमित्त नागनाथ मंदिरात सायंकाळी पाच वाजता विविध आभूषणे घालून विशेष अलंकार महापूजा करण्यात आली. यामध्ये नागनाथास पुतळ्याची माळ कर्णकुंड सोन्या-चांदीचा गोप यास विविध आभूषणे घालण्यात आली होती. ही (Makar Sankranti) अलंकार पूजा शेखर, भोपी, बबन गोरे, दीपक कोळी यांनी केली या मनमोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीसह हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्या त सह भाविकांनी गर्दी केली होती.
यावेळी नागनाथ संस्थान सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर संस्थांच्या अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे अध्यक्ष वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गार्ड प्रमुख बबन सोनवणे, जगदेव दिंडे , गणेश जगताप संतोष गोबाडे मंचक सोळंके दशरथ राठोड बंदोबस्त ठेवला होता. यावेळी नागनाथाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती संस्थांकडून भाविक भक्तांना सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.