विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्णय विधानभवनावर लाँग मार्च निघणार.
नागपूर (Nagpur) :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विदर्भाशी विश्वासघात करणाऱ्या भाजपचा ( BJP ) जवळपास विदर्भातून (Vidarbha) पूर्णत सुपडासाफ झाला आहे. त्यामुळे आता वेगळा विदर्भाकरिता सत्ताधाऱ्यांनी चालढकल करू नये. विदर्भाची मागणी अधिक तीव्र करून तत्काळ राज्य पदरी पडून घेण्याच्या दृष्टीने व मागणीची प्रखरता केंद्र सरकारचे तातडीने निदर्शनास आणून तीव्र आंदोलनाचा भाग म्हणून दि. ९ ऑगस्ट रोजी शहीद दिनी समितीच्या वतीने यशवंत स्टेडीयनपासून (Yashwant Stadium) विधानभवनापर्यंत लाँगमार्च काढण्यात येईल. याच दिनी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत आज शुक्रवार रोजी माजी आमदार आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड . वामनराव चटप यांनी दिली. यावेळी चटप पुढे म्हणाले की, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा समन्वयक, जिल्हा युवा आघाडी, महिला आघाडी अध्यक्षा शहर अध्यक्ष यांची बैठक आज पार पडली. केंद्रात नवनियुक्त नवे सरकार येत आहे. त्यापुढे प्रभावीपणे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी प्रभावीपणे लावून धरण्याच्या दृष्टीने व नव्या सरकापुढे विदर्भ राज्य निर्मिती तातडीने करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारला ( Central Govt ) बाध्य करण्याकरिता प्रभावी आंदोलनाच्या हत्याराचा वापर करून आंदोलनाची नवी दिशा ठरवून येणाऱ्या विधानभसभेच्या निवडणुका आधीच अब की बार- विदर्भ की सरकार या दृष्टीने येत्या संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात मागणीला धार आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
… तर काँग्रेसलाही विदर्भाची जनता माफ करणार नाही
विदर्भाशी विश्वासघात करणाऱ्या भाजपचा जवळजवळ सुपडासाफ झाला आहे. तर शिंदे व उत्बाठा हे शिवसेनेचे दोन्ही गटाला पूर्व विदर्भातून विदर्भातील जनतेने हद्दपार केले आहे. त्यामुळे येणाऱ्या सरकारला विदर्भाचे राज्यतातडीने निर्माण करणे सोयीचे व सुकर झाले आहे. यामुळे विदर्भ निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. विदर्भ वेगळे करण्यासाठी काँग्रेसनेही ( Congress ) महत्त्वाची भूमिका बजावली नाही तर त्यांनाही विदर्भाची ( Vidarbha ) जनता माफ करणार नाही, असेही चटप यावेळी म्हणाले. यावेळी पत्रपरिषदेत डॉ. श्रीनिवास खांदेवाले, रंजना मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर, डॉ. रमेशकुमार गजबे उपस्थित होते.
.