राजर्षी छत्रपती शाहु महाराजांचा पुतळा बसवा
-बसपातर्पे राजर्षी छत्रपती शाहु महाराजांचा स्मृतिदिन साजरा
नागपूर (Nagpur) :- बसपातर्पे (BSP ) राजर्षी छत्रपती शाहु महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांचा १०२ वा स्मृती दिवस कार्यक्रम मेडिकल चौक येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मेडिकल चौकात राजर्षी छत्रपती शाहु महाराजांचा पुतळा (statue) बसविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन (intense agitation) करण्यात येईल असा इशारा बसपा जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम (BSP district president Sandeep Meshram) यांनी दिला.
यानिमित्त मेश्राम यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला (Full image) माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. नागपूर हे पुतळ्यांचे शहर असले तरी या महापुरुषांचा नागपुरात पुतळा नाही. ही बाब लक्षात घेऊन २००३ ला नागपुरातील बसपाच्या नगरसेवकांनी शाहू महाराजांच्या पुतळ्या संदर्भात प्रस्ताव मांडला.
महाराष्ट्र शासनाने शाहू महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन करावे.
विकास ठाकरे हे महापौर (Vikas Thackeray ) असताना मेडिकल चौकात (Medical Square) शाहू स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली. त्यानंतर अनेकदा निवेदने, धरणे, निदर्शने करुनही मनपा व राज्य शासनाच्या वतीने त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. २०२४ हे वर्ष छत्रपती शाहू महाराजांचे १५० वे वर्ष असून २६ जून ही त्यांची जयंतीची तारीख आहे. या तारखेपूर्वी मनपा व महाराष्ट्र शासनाने ( Maharashtra Govt) शाहू महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन करावे. अन्यथा बसपा मेडिकल चौकातील त्या नियोजित ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मेश्राम यांनी दिला.