तीन आरोपींना अटक, आरपीएफ आणि सीआयबीची संयुक्त कारवाई
देशोचती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur) रेल्वे सुरक्षा दल आणि सीआयबीच्या (CIB) संयुक्त कार्यवाहीत रेल्वेतून (train) चोरट्या पद्धतीने गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीना अटक करण्यात आली. या कारवाईत पथकाला एकूण ११ बॅगमध्ये १०८.६५ किलो गांजा आढळला ही कारवाई २ आणि २ जून रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरील ( Nagpur Railway Station ) फलाट क्रमांक १ वर करण्यात आली. योगेश नर्मदा प्रसाद आणि राजेश यादव, शिव दुबे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत. रेल्वेतून मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने मादक पदार्थ, दारू आणि हवाला रुपयांची तस्करी होत असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने याकडे लक्ष दिले आहे. त्यानुसार रेल्वेकडून पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात नागपूर आरपीएफ ( RPF ) आणि सीआयबी यांचे संयुक्त पथक लक्ष ठेवून आहेत.
> त्यांची हालचाल संशयास्पद
सीआयबी आणि आरपीएफचे नागपूरचे पथक रेल्वे स्थानकावर लक्ष ठेवून असताना २ आणि ३ जून रोजी त्यांना फलाट क्रमांक १ वरील एफओबीखाली असलेल्या विविध स्टेशन खांबासमोर काही बॅगआढळल्या. ज्या बॅग काही प्रवाशांनी ठेवल्या होत्या. बॅग ठेवत असताना त्यांच्या संशयास्पद हालचाली होत्या संशयास्पद हालचाली होत असताना सीआयबी पथकाने त्याच्यावर करडी नजर ठेवली. त्यांची हालचाल संशयास्पद अधिक आढळल्याने पथकाने थेट उपस्थित असलेल्या दोन प्रवाशांची चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीत त्या प्रवाशांनी बॅग आपल्याच असल्याचे सांगितले. तसेच गांजा असल्याची कबुली दिली तर डॉग स्क्वॉडच्या डॉग प्रिंसनेही ( Dog Prince ) गांजा असल्याचा इशारा दिला. त्यामुळे पथकाने योगेश नर्मदा प्रसाद आणि राजेश यादव यांना ताब्यात घेतले. यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून शिव दुबे या तिसरा क्रमांकाच्या आरोपीचे शोधकाम पथकाने केले. दुबे हा स्लीपर क्लास वेटिंग रुम बाहेर असल्याचे दिसताच पथकाने त्यालाही ताब्यात घेतले त्यानंतर तिघेही आरोपी आणि ११ गांजा असलेल्या बॅगा आरपीएफचे यांच्याकडे सुपूर्द केले. उपनिरीक्षक यांच्या कडे सुपूर्द केले.
> ११ बॅगमध्ये होता गांजा
आरपीएफ उपनिरीक्षकांनी ( Sub-Inspector ) घटनास्थळाचे निरीक्षण आणि पंचनामा करून कागदोपत्री कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या ११ बॅगमधील (६ ट्रॉली व ५ पिहुॅ बॅग) १०८.६५ किलो गांजाची किंमत जवळपास १६,२९,७५० रुपये आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी आणि गांजा लोहमार्ग पोलिस आणि एनडीपीएस पथकाला सूपूर्व करण्यात आले. लोहमार्ग पोलिस पुढील कारवाई करीत आहे.