- मनपाने पाच अवैध होर्डिंग हटविले
- रेल्वेच्या जागेवर विनापरवाना सात होर्डिंग
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur) : महानगरपालिकेच्या सीमा क्षेत्रातील जाहिरात होर्डिंगचे (advertising hoardings) सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी मनपाच्या आकाशचिन्ह विभागाचा कर थकीत असलेले, जीर्ण झालेले होर्डिंग हटविले सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील पाच होर्डिंग हटविले आहेत. त्यापैकी परवाना शुल्क थकीत असल्याने तीन होर्डिंग काढण्यात आले आहेत.
मुंबईमधील (Mumbai) घाटकोपर येथे रेल्वेच्या (railways) जागेवर लागलेले तब्बल २५० टन वजनाचे होर्डिंग (Hoarding of weights) १३ मे रोजी वादळी पावसात कोलमडून कोसळून पडले. त्यामध्ये १८ जणांचा मृत्यू व ७० लोक जखमी आहेत. हा देशातील होर्डिंगचा सर्वांत मोठा अपघात होता. त्याची दखल घेऊन नागपूर मनपा आयुक्त (Commissioner) डॉ. अभिजित चौधरी (Dr. Abhijit Chaudhary) व उपायुक्त मिलिंद मेश्राम (Milind Meshram) यांनी शहरातील होर्डिंगबाबत आढावा घेतला. त्या आढावा बैठकीत आयुक्तांनी शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. मनपाच्या आकाशचिन्ह विभागानुसार, मनपाने होर्डिंग लावण्यासाठी ९ मे २०२२ रोजी नियमावली बनविली आहे. मात्र, रेल्वे विभाग (Railway Department) त्या नियमावलीला दाद देत नाही. मनपाने होर्डिंग अवैध होर्डिंग पाहताचा परवाना शुल्क थकीत असलेल्या होर्डिंगवर कारवाई सुरू केली आहेत. त्यानुसार, आतापर्यंत पाच होर्डिंग परवाना शुल्क थकबाकीमुळे काढण्यात आले आहे. न्मुंबई मनपाने मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सुनावणी करून २०१७ मध्ये रेल्वेच्या जागेवर होर्डिंग लावण्याकरिता मनपाची परवानगी घेण्याची गरज नसल्याचा आदेश दिला. तसेच मनपा व रेल्वे रेल्वे (Railway Railways) प्रशासनाने एकत्रित होर्डिंग धोरण ठरवण्याची सूचना केली. परंतु त्याकडे रेल्वेने लक्ष दिले नाही. दरम्यान, रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिले. ती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आकाशचिन्ह विभागाच्या दाव्यानुसार, शहरात मनपाची परवानगी न घेताच रेल्वेच्या जागेमध्ये १५० होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.शहरात किमान २०० चौरस फुट ते १२०० चौरस फुटापर्यंत होर्डिंग लावण्याची परवानगी आहे. त्यासाठी महापालिकेकडे रितसर अर्ज करावा लागतो.
- ६४७ होर्डिंगचे सर्वेक्षण
घाटकोपर (Ghatkopar) येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे शहरात सर्वेक्षण सुरू (Survey started city) करण्यात आले आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६४७ होर्डिंगचे सर्वेक्षण (duly licensed) करण्यात आले. ते सर्व होर्डिंग मनपाचा रितसर परवाना घेऊन लावण्यात आले आहेत. मनपाची परवानागी न घेता रेल्वेच्या जागेवर सात होर्डिंग आढळून आले आहेत. सध्या शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे सुरू आहे. होर्र्डिंगची साईज देखील पाहण्यात येत आहे, अशी माहिती उपायुक्त (Deputy Commissioner) मिलिंद मेश्राम (Milind Meshram) यांनी दिली.