काटोल मतदारसंघातून आम आदमी पार्टीकडून वृषभ वानखेडे यांची उमेदवारी जाहीर.
नागपूर ( Nagpur ) आम आदमी पक्ष महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार असून नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार करण्याची घोषणा केली. आम आदमी पक्षाच्या ( Aam Aadmi Party ) नेत्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्यांनी आगामी निवडणुकीत जनतेच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार करण्याचे आश्वासन दिले. बेरोजगारीः राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या संकटाला आळा घालण्यासाठी आप ठोस योजना आणि उपाययोजना सादर करणार आहे. तरुणांच्या रोजगाराच्या संधी वाढवणे हे आपले प्राथमिक लक्ष्य असेल. शिक्षण क्षेत्रात दिल्ली आणि पंजाब च्या धर्तीवर गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आप विविध योजना आणणार आहे. गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षणाची निर्धार आहे. हमी देणारी प्रणाली तयार करण्याचा आपचा आरोग्यः राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी आप विशेष योजना घेऊन येणार आहे. सर्वसामान्य जनतेला मोफत आणि चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
लोकसभेत संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो.आता राज्यात 50 ते 70 जागेसाठी पक्ष मजबूत उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. सामाजिक क्षेत्रातील काम करणारे कार्यकर्ते इतर पक्षातील सदस्य पक्षाच्या संपर्कात असून येत्या काळात दिसणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमीभावः शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आप शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आप मैदानात उतरणार आहे. राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब प्रमाणे महाराष्ट्रात 200 युनिट मोफत करणार.
- महाराष्ट्राची ढासळलेली संस्कृतीः
आपल्या राजकीय स्वार्थासाठी जाती जाती मध्ये तेढ निर्माण करू सत्ताधारी पक्ष हे नुसते राजकारण करत आहे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला ठेस पोहोचण्याचा काम करत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आप विशेष प्रयत्न करणार आहे. हार्दिक संविधानाने चालतो आणि संविधानाने सर्वांना समान संधी दिलेली आहे जातीसाठी मधील तेढ हे राज्याला घातक आहे आणि राज्याची संस्कृती आहे की सर्व लोकाभिमुख शासन आपच धोरण आहे राज्य सरकार आल्यावर राज्यातील जनतेला एकत्रित आणण्यासाठी जे राज्याचे वैभव आहे एक सांस्कृतिक वैभव जपण्याचे काम आम आदमी पार्टी क करेल. आम आदमी पार्टीचा असा विश्वास आहे की या मुद्द्यांवर केंद्रित राहून आणि जनतेच्या अपेक्षांवर उतरण्याचे वचन देऊन आपण नागपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात स्थान निर्माण करू शकतो. आपचे उमेदवार स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जातील.