लाचखोर उत्पादन शुल्क निरीक्षक कोकरेला अटक
नागपूर (Nagpur) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) निरीक्षकाने बियरबारचा परवाना (Beerbar license) देण्यासाठी तब्बल ४ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ३ लाख २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) अटक केली. रवींद्र लक्ष्मण कोकरे वय,४९ (Rabindra Laxman Kokre) असे लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, लाचखोर रवींद्र कोकरे हा लोभी प्रवृत्तीचा अधिकारी होता. पूर्वी हिंगणा (Hingena) येथील कार्यलयात कार्यरत असतांना त्याची कारकीर्द ही वादग्रस्त होती. त्याच्या कार्यपद्धतीमुळे अनेक जण त्रस्त झाले होते. सध्या रवींद्र कोकरे हा काटोल विभागात निरीक्षक (Inspector in Katol Division) या पदावर कार्यरत होता. तसेच त्याच्याकडे उपाधीक्षक पदाचा प्रभार होता. तक्रारदार युवक हा नागपुरातील फ्रेण्ड्स कॉलनीत राहणारा असून त्याला एफएल-३ बीयर (FL-3 beer) बारचा परवाना हवा होता. त्या युवकाने दस्तावेज पूर्ण देऊन रवींद्र कोकरे याच्याकडे फाईल दिली. ती फाईल मंजूर करून अधीक्षकाकडे पाठविण्यासाठी कोकरेने ४ लाख (4 lakhs)
रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने चार लाख रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लेखी तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करीत गुरुवारी सायंकाळी कार्यालयात सापळा रचला. चार लाखांऐवजी ३ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी लाचखोर कोकरेने दर्शविली.
शौचालयात लपणार तोच आवळल्या मुसक्या
यावेळी एसीबीच्या पथकाने लाचखोर (Bribery by ACB team) कोकरेच्या मुसक्या आवळल्या. तत्पूर्वी आपण लाचेच्या ट्रॅपमध्ये अडकल्याचे कोकरेच्या लक्षात येताच त्याने शौचालयात लपण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. एका पथकाने कोकरेच्या घराची झाडाझडती घेतली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर आणि अप्पर अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे यांच्या पथकाने केली.
०००००००