`पोस्टर बॉय’ला प्रचंड विरोध; बौद्धांसह तेली मते ठरतील `निर्णायक’
नागपूर (Nagpur Assembly Elections) : दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार मोहन मते (Mohan Mate) आणि कॉग्रेस उमेदवार गिरीश पांडव (Girish Pandav) यांच्याविरुद्ध बीआरएसपीकडून माजी नगरसेविका विश्रांती झांबरे तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेविका सत्यभामा लोखंडे या दोन माजी महिला नगरसेविका `जॉईंट किलर’ म्हणून समोर आल्या आहेत. त्यामुळे दक्षिण नागपूरच्या निवडणुकीला रंगत आली आहे.
या दोन्ही महिला नेत्यांनी मतदार संघ (Nagpur Assembly Elections) अक्षरसहा पिंजून काढला आहे. शिक्षणाचे बाजारीकरण, वाढती भांडवलशाही, महागाई, बेरोजगारी असे विविध मुद्दे मतदारांसमोर उपस्थित करुन त्या मते मागत आहेत. त्यांचा सततचा जनसंपर्क आज त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे. विश्रांती झांबरे या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. बसपाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्यासोबत त्यांनी कार्य केले आहे. अनेक अंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनिय ठरली आहे. त्यांच्यासाठी बौद्ध समाजाचे काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष नंबर एकचे शत्रू आहेत. ही संविधान व लोकशाही वाचविण्याची लढाई आहे.
`डोनेशन’शिवाय शाळा-महाविद्यालयात प्रवेश न देणारी मंडळी राजकारणात सक्रीय आहे. (Nagpur Assembly Elections) शिक्षणाचा धंदा मांडणारे आज आमदार होऊ पाहत आहे. केवळ `पोस्टर बॉय’प्रमाणे मोठ मोठे होर्डिंग लावून स्वतला नेते म्हणून मिरवणारी मंडळी `व्हिआयपी कल्चर’ आणू पाहत आहेत, असा प्रश्न यंदा प्रचारादरम्यान उपस्थित केला जात आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सत्यभामा लोखंडे यांचासुद्धा प्रचारात झंझावात सुरू आहे. लोखंडे कुटुंबीयांचे आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान आहे. नगरसेवक म्हणून लोखंडे यांची सुद्धा कारकिर्द उल्लेखनिय ठरली आहे. वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत (Nagpur Assembly Elections) त्यांनी बसपाच्या उमेदवार म्हणून २३,१५६ मते घेतली होती, हे विशेष.
बीएसपीकडून संजय सोमवुंâवर मैदानात
बहुजन समाज पक्षाने (Nagpur Assembly Elections) दक्षिण नागपुरातून संजय सोमकुंवर यांना मैदानात उतरविले आहे. सोमकुवर यांनी जनसंपर्कावर भर दिला आहे. भाजपचे मोहन मते (Mohan Mate) हे आपल्या कार्यावर मते मागत आहेत. मनसेकडून अनुप दुरुगकर हे उमेदवार रिंगणात आहे. उत्तर प्रमाणेच दक्षिण नागपूरसुद्धा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असला तरी महाविकास आघाडीने रिपब्लिकन पक्षाला प्रचारात कुठेही स्थान न दिल्याने कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत.