मेडिकलच्या डॉक्टरांना निष्काळजीपणा भोवला,अधिष्ठात्यांसह ११
डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
२०१९ मध्ये मेडिकलमध्ये शस्त्रक्रियेनंतर एका महिलेचा मृत्यू झाला होता.
नागपूर (Nagpur) : मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये (Founder Dr. Raj Gajbhiye) यांच्यासह यांच्यासह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला. २०१९ मध्ये मेडिकलमध्ये शस्त्रक्रियेनंतर एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती.(approached the court.) न्यायालयाच्या निर्देशानंतर अजनी पोलिस ठाण्यात (Ajani Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे वैद्यकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.डॉ. राज गजभिये यांच्यासह डॉ. भूपेश तिरपुडे, डॉ. हेमंत भनारकर, डॉ. वासुदेव बारसागडे, डॉ. अपूर्वा आनंद, डॉ. सुश्मिता सुमेर, डॉ. विक्रांत अकुलवार, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. गिरीश कोडापे, डॉ. विधेय तिरपुडे व डॉ. गणेश खरकाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची काळजी घेण्यात निष्काळजीपणा झाला होता असे समितीने अहवालात नमूद केले.
जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक केवलराम पांडुरंग पटोले ६५ (Retired Superintendent Kewalram Pandurang Patole) हे तक्रारदार असून त्यांची पत्नी पुष्पा यांच्या मानेवारील गाठीसंदर्भात डॉ. गजभिये यांना दाखविले होते व ४ जुलै २०१९ रोजी त्यांना शस्त्रक्रियेसाठी बोलविण्यात आले होते. त्यांना त्या दिवशी दाखल करण्यात आले. ६ जुलैला पुष्पा यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र अचानक प्रकृती गंभीर झाल्याचे दोन डॉक्टरांनी सांगितले. दुपारी त्यांच्या पत्नीला बाहेर आणण्यात आले. त्यांच्या डोळ्यावर कापूस ठेवला होता. व नाकाला रबरी नळी जोडली होती. त्यांना आयसीयूमध्ये नेण्यात आले व नातेवाईकांना भेटूदेखील दिले नव्हते. डॉ. गजभिये यांनी दुसर्या दवाखान्यात नेऊ देण्यासदेखील नकार दिला. ८ जुलैला पटोले यांनी ओळखीच्या डॉक्टरांच्या माध्यमातून डिस्चार्जसाठी संपर्क साधला असता रात्री त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पत्नीचे शवविच्छेदनदेखील झाले नाही. शस्त्रक्रियेदरम्यानच पत्नीचा मृत्यू झाला होता. मात्र निष्काळजीपणा लपविण्यासाठी गजभिये व इतर डॉक्टरांनी पुष्पा यांना कार्डियाक अरेस्ट आल्याचे नाटक केल्याचा आरोप पटोले यांनी केला. ३० जून २०२० रोजी त्यांनी अजनी पोलिस ठाण्यात (Ajani Police Station) डॉ. गजभिये व इतर डॉक्टरांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीवर चौकशी समितीन नेमली असता पाच डॉक्टरांच्या समितीने पुष्पा यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टने झाल्याचे अहवालात नमूद केले. पटोले यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना अहवालाचे पुनरावलोकन करण्याबाबत अर्ज केला होता. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी पाच डॉक्टरांची समिती नेमली व सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची काळजी घेण्यात निष्काळजीपणा झाला होता असे समितीने अहवालात नमूद केले.