विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या धाडीनंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
नागपूर (Nagpur) :- बोगस खतांची (bogus fertilisers) विक्री करून शेतकर्याची फसवणूक करणार्या खतनिर्मिती कंपनीसह (Fertilizer Company) विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या धाडीनंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. कृषी विभागाच्या पथकाकडून (Agriculture Department ) ५० हजार रुपये किमतीचा खतांचा साठाही ताब्यात घेण्यात आला. खरिपाचा हंगाम सुरू झाला असून, आता शेतकर्यांना बी-बियाणे, खतांची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकर्यांकडून याच्या खरेदीची लगबग सुरू आहे.
– डीएपी खताचा प्रकार असलेले बोगस खत मिळून आले.
अशातच रामटेक तालुक्यातील (Ramtek Taluka ) मौजा चोखाळा येथे एका शेतकर्याच्या शेतावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकारी प्रवीण नागरगोजे व मोहीम अधिकारी जयंत कौटकर यांनी तपासणी केली असता, तिथे त्यांना डीएपी खताचा प्रकार असलेले बोगस खत मिळून आले. याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिकार्यांनी ५२ हजार ५०० रुपये किमतीचा सर्व खतांचा साठा ताब्यात घेऊन खतांची निर्मिती करणार्या कंपनीसह शेतकर्यांना विकून त्यांची फसवणूक करणार्यांविरुद्ध अरोली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.