-दहावी-बारावीत विद्यार्थी चमकले, यंदा निकलात वाढ
नागपूर (Nagpur) : सीबीएसईच्या दहावी-बारावी परीक्षेत मिळविल्यानंतर सर्वांचे लक्ष जिल्ह्यातील खाजगी शाळांकडे लक्ष राहत असते. पण गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील आदीवासी विद्यार्थ्यांना (Adivasis students ) इंग्रजी माध्यामाच्या बारावीपर्यंत सीबीएसईमधून शिक्षणाच्या प्रवाहात आणारी एकलव्य मॉडेल रेसिडेशियल स्कूलच्या (Eklavya Model Residential School) विद्यार्थ्यांनी यावेळी घवघवीत यश मिळविले आहे.
बारावी विज्ञान परीक्षेत वैष्णवी कोकाडे (७५.६) टक्के, प्रथम स्थान महाविद्यालयातून प्रथम स्थान पटकाविले आहे तर दीक्षा कुमरे (६८.८टक्के), हिने दहावी परीक्षेत प्रथम स्थान पटकाविले आहे. रामटेक येथील खैरी परसोडा (Khairy Parsoda) येथे ही शाळा आहे. पहिल्या वर्गापासून ते १२ वी पर्यंत शिक्षण दिले जाते. तेही आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणून त्यांच्या दर्जात वाढ व्हावी. ताठ मानेने जगता यावे याकरिता केंद्र सरकारने देशात एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरु करण्यात आले आहे. गत वर्षी खैरी परसोडा येथील शाळेतून दहावी- बारावीत ५७ विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नव्हता. त्यामुळे तत्कालीन मुख्यध्यापक यांच्या विरोधात विद्यार्थ्यांसह पालकांचा रोष होता. (students and parents against the then principal.) अखेर मुख्यध्यापक यांची उचलबांगडी झाल्यानंतर बोरेकर यांच्याकडे मुख्यध्यापक पदाचा कारभार यांच्याकडे आला. यंदाच्या सीबीएसईच्या दहावी-बारावीत परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे.
दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी
दहावीच्या परीक्षेत यंदा दीक्षा कुमरे(६८.८टक्के), दुर्गेश उईके (६५.४), रुषभ मडावी (६१.२ टक्के), तन्वी आत्राम (६०.४टक्के), नितीन उईके (५७.६ टक्के), शृतीका उईके (५६.२ टक्के), चेतन भावेदी (५६ टक्के), हर्षल धुर्वे (५५.२ टक्के), सपना टेकाम(५५ टक्के), श्रेया वरठी (५४.२ टक्के), अशा दहा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
बारावी विज्ञानमधील यशस्वी विद्यार्थी
विज्ञान शाखेतून वैष्णवी कोकाडे (७५.६) टक्के, रीया नन्नावरे (६८.६ टक्के), करीना मडावी (६३.४ टक्के), सुकेशनी कुलसांगे (६०.४ टक्के), भुषण श्रीरामे (६१.१७ टक्के),प्रेम कुमरे (६०.४ टक्के),नयन कोडवते (६० टक्के), सुरज सलामे (५९.६ टक्के), जयश्री नन्ना (५९.६७ टक्के),आयुष नन्नावरे (५८.६ टक्के) इत्यादी विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.