कार्यक्रमाची तयारी जोमात
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (CM Ladki Bahin Yojana) : महिला सक्षमीकरणाकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (CM Ladki Bahin Yojana) या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे भव्य आयोजन येत्या ३१ ऑगस्ट रोजी येथील रेशीमबाग मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी शहरी, ग्रामीणसह सर्व विभागांना टार्गेट दिले असून ५० हजार महिलांना गोळा करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (CM Ladki Bahin Yojana) या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे येत्या ३१ ऑगस्ट रोजी होणार्या आयोजनाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज बुधवारी विविध प्रशासकीय विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले. या विशेष कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचे थेट वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व नागरी भागातील ५० हजार महिला या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या आढावा बैठकीत देण्यात आलेल्या सूचनानुसार अंमलबजावणीबाबत विविध विभागांकडून माहिती देण्यात आली. मुख्य कार्यक्रमस्थळी उचित व्यवस्था व सुरक्षा, या (CM Ladki Bahin Yojana) कार्यक्रमासाठी येणार्या महिला लाभार्थ्यांची आसन व्यवस्था, प्रसार माध्यमांची व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था आदींसह शासनाच्या विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत बिदरी यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या. सर्व विभागाने नियोजित जबाबदार्या काटेकोर व वेळेत पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महानगरपालिकेकडे २५हजार महिलांची जबाबदारी
लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) पहिल्या टप्प्यात ५ लाख ५० हजार महिलांनी अर्ज केले आहेत. तर दुसर्या टप्प्यात ३ लाख ५४ हजार महिलांनी अर्ज केले आहे. त्यांना शनिवारी लाभ दिला जाणार आहे. सदर कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे १५ हजार, जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपालिका यांच्याकडे १० हजार व महानगरपालिकेकडे २५ हजार महिलांची जबाबदारी दिल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.