नागपूर (Nagpur company Fire) : नागपूर-अमरावती मार्गावर हिंगणा पोलिस स्टेशन (Hingna Police) हद्दीतील धामणा येथील स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट झाला. या (Nagpur Fire) स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, 5 कामगार जखमी झाले आहेत. यातील काही जखमींना उपचारासाठी नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील गंभीर जखमींना रविनगर येथील (Sengupta Hospital) सेनगुप्ता हॉस्पिटलला हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सहा कामगारांचा मृत्यू
माहितीनुसार, हिंगणा तहसीलच्या धामणा येथे एक चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे. या कंपनीत स्फोटकांशी संबंधित कामे केली जातात. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास पॅकेजिंग विभागात अचानक मोठी आग (Nagpur Fire) लागली. त्यानंतर काही वेळात या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी कंपनीच्या आत 10 कामगार काम करत होते. हा स्फोट इतका भीषण होता की, तिथे काम करणाऱ्या 10 पैकी पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, चार ते पाच कामगार जखमी झाले आहेत. घटनेची माहिती कळताच (Hingna Police) हिंगणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने नागपूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग कशी लागली, याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. हिंगणा पोलीस (Hingna Police) पुढील तपास करीत आहे.