– नॉर्थ नागपूर सिनिअर सिटीझन फोरमची मागणी
नागपूर (Nagpur): उत्तर नागपूर परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे संथगतीने सुरू असल्याचा आरोप नॉर्थ नागपूर (North Nagpur) सीनिअर सिटीझन (Senior Citizen) फोरम व नॉर्थ नागपूर महिला फोरमने केला आहे. या भागात काही ठिकाणी मेट्रो सुरू झाली. मात्र, त्यांच्या स्थानकांचे काम रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने प्रशासनाने (administration) उत्तर नागपूरच्या विकास कामांकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली. तसे निवेदन मेट्रोच्या व्यवस्थापकीय (Manager of Metro) संचालकांना देण्यात आले.
शहराच्या अनेक भागात मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होऊन मेट्रो सुरू झाली. परंतु, उत्तर नागपुरातील इंदोरा मेट्रोस्थानकाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा आरोप केला. इतर स्थानकांचे काम पूर्ण झाले असताना महत्त्वाच्या इंदोरा स्थानकाचे काम अपूर्ण असल्याने शंका उपस्थित करण्यात आली. मेट्रो रस्त्याच्या कामांची तीच अवस्था आहे.
– मेट्रोच्या कामामुळे अनेक भागात खड्डे
मागील दोन वर्षापासून रस्त्याचे काम झाले आहे. परंतु अद्यापपर्यंत रस्त्याच्या मधोमध बनवलेल्या दुभाजकावर वृक्षारोपणाचे (Plantation) काम अपूर्ण आहे. मेट्रोच्या कामामुळे अनेक भागात खड्डे आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. असे असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. प्रशासनाने तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.