नागपूर (Nagpur) :- काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडलेल्या या घटनेतून पूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्येंद्र आणि जीतेश हे दोघे भाऊ आणि दोघेही शेतकरी. दोघांनीही शेती करून पैसा गोळा केला. शेतीच्या कामात दोघेही भावंडांनी लग्न केले नव्हते. शेवटी एका नातेवाईकांच्या मदतीने ३५ वर्षीय मोठा भाऊ याचे तीन वर्षांपूर्वी एका नातेवाईक तरुणीशी लग्न झाले.
दोघेही एकाच वयाचे असल्यामुळे दोघांचे घरातही चांगले पटत
ती तरुणी नातेवाईक असल्यामुळे दोघेही भाऊ तिला लग्नाच्या पूर्वीपासून ओळखत होते. जीतेशचे मोठ्या थाटात लग्न झाले त्यात सर्व काही सुरळीत सुरु होते. मोठ्या भावाने स्वत:चा संसार थाटला. घरातील वातावरण आनंदमय होते. मात्र, काही महिन्यानंतर सत्येंद्रचे वहिणी स्विटी हिच्याशी सूत जुळले. दोघेही एकाच वयाचे असल्यामुळे दोघांचे घरातही चांगले पटत होते. त्यामुळे घरात कुणालाही त्यांच्या संबंधाबाबत संशय नव्हता. परंतु, काही महिन्यांतर वहिणी आणि दिरामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. नेहमी शेतात कामावर जाणारा सत्येंद्र शेतात जात नव्हता. अनेकदा तो घरात एकटाच राहत होता. त्यामुळे मोठ्या भावाला दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत (Immoral relationship)थोडी जाणीव झाली.
बायको आणि भाऊ दिसले एकाच खोलीतमोठा
भाऊ शेतात गेल्यानंतर वहिणी आणि दिर दोघेही एकाच खोलीत बसलेले होते. त्यादरम्यान, शेतात गेलेला भाऊ तासाभरात परत आला. तो घरात गेला असता दोघांनाही त्याने एकाच खोलीत बघितले. त्याने बायकोला जाब विचारला असता डोळ्यातील कचरा दिर काढून देत असल्याचे तिने सांगितले. मात्र, बायकोच्या चारित्र्यावर त्याला संशय आल्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी घर सोडले.
चिडलेल्या भावाने मित्र संदीप याच्या मदतीने संपविण्याचा कट रचला
जातेश याने दोन वर्षाआधी घर सोडून बायकोसोबत बाहेर गावी निघून गेला होता. दोन वर्षे बाहेरगावी राहणारा जीतेश हा पत्नी व बाळासह पुन्हा गावी परतला. शेती करायला लागला. यादरम्यान वहिणी आणि दिराचे पुन्हा प्रेम फुलले. मोठ्या भावाने पत्नी व भावाला दोघांनाही मारहाण (beating) केली. त्यामुळे चिडलेल्या भावाने मित्र संदीप याच्या मदतीने संपविण्याचा कट रचला. भाऊ रात्रीला शेतात गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे दोघेही गेेले. त्यांनी जीतेशचा कुऱ्हाडीने वार करुन खून (Murder)केला. काटोल पोलिसांनी मात्र २४ तासांच हत्याकांड उघडकीस आणले. दोन्ही आरोपीस अटक केली.