Nagpur Crime:- चार-पाच तरुणांच्या टोळक्याने विद्यापीठ रोडवरील अपार्टमेंट मध्ये मध्यरात्री घुसून तरुणाला मारहाण (beating) केल्याची घटना नागपुरात घडली.
रिद्धी सिद्धी अपार्टमेंट जवळील घटना
दोन समूहामध्ये रस्त्यावर वाद झाल्याने तरुणांनी अपार्टमेंटच्या पायऱ्यांवर तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींपासून वाचण्यासाठी तरुण घराच्या दिशेने धावताच त्याला अडवत टोळीने त्यांना जबर मारहाण करत पहिल्या माळ्यावरून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. ही घटना आली रिद्धी सिद्धी अपार्टमेंट जवळ घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पुढील तपास नागपूर शहर पोलीस करत आहेत.