हायकोर्टाने याचिका फेटाळली
नागपूर (Nagpur Crime) : इसासनी येथील कुख्यात गुन्हेगार दीपक उर्फ काल्या सुनील सिंग याला स्थानबध्द करण्याचा आदेश कायदेशीरच आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. तसेच या आदेशाविरूध्द काल्याने दाखल (Nagpur Crime) केलेली याचिका फेटाळून लावली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. काल्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सार्वजनिक शांतता व सुवव्यवस्था धोक्यात आली होती. परिणामी, पोलिस आयुक्तांनी ४ सप्टेंबर २०२३ रोजी आदेश जारी करून काल्याला स्थानबध्द केले. राज्य सरकारने १९ सप्टेंबर २०२३ रोजी तो आदेश कायम ठेवला. त्यावर काल्याचा आक्षेप होता.
ही कारवाई अवैध असल्याचे त्याचे म्हणणे होते. न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता त्याचा हा दावा गुणवत्ताहीन ठरविला, काल्याने २०१८ पासून विनभंग, शस्त्राने दुखापत, मारहाण इत्यादी गंभीर गुन्हे केले आहेत. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई (Nagpur Crime) केल्यानंतरही तो सुधारला नाही. स्थानबध्द केल्याची माहिती मिळाल्यानंतर तो फरार झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्याला २७ सप्टेंबर २०२३ रोजी मध्य प्रदेशातील इटारसी येथून ताब्यात घेतले. सल्लागार समितीने त्याच्या विरोधात विविध शिफारशी केल्या आहेत.