हमसफरमध्ये ८८ हजारांची दारू जप्त तीन आरोपी ताब्यात
नागपूर (Nagpur) : रेल्वेत (train) मोठ्या प्रमाणात चोरट्यापद्धतीने अनेक वस्तूची तस्करी होत असते. त्यात दारूचाही समावेश असतो. अशाच अवैध पद्धतीने रेल्वेच्या हमसफर एक्सप्रेसमध्ये (Humsafar Express) ८८,५०० रुपये किमतीची इंग्रजी दारू (English liquor) जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरपीएफला (RPF) ४ मे रोजी ट्रेन क्रमांक २२७०६ तिरुपती हमसफर (Train No. 22706 Tirupati Humsafar) एक्सप्रेसमधून इंग्रजी मद्याची तस्कर होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
बोगी क्रमांक बी ४ मध्ये तीन संदिग्ध बॅग आढळल्या
नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur Railway Station) गुन्हे गुप्तचर शाखेचे निरीक्षक (Inspector of Intelligence Branch) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गुप्तचार शाखा, आरपीएफचे उपनिरीक्षक, नार्कोटिक्स पथक आणि श्वान पथक नागपूरचे प्रिन्स कुत्र्याचा समावेश असलेले पथक सज्ज झाले. रेल्वे स्थानकावर हमसफर एक्सप्रेस आली असता ट्रेनमधील बोगीची तपासणी करण्यास पथकाने सुरुवात केली. पथकाला बोगी क्रमांक बी ४ (Bogie No. B 4) मध्ये आसन क्रमांक ५२ आणि बी १४ मधील आसन क्रमांक १५ आणि ४५ मध्ये तीन संदिग्ध बॅग (Three suspicious bags) आढळल्या. ज्यात दोन ट्रॉली बॅक आणि एक बोरी बॅगचा समावेश होता. पथकाने प्रवास करण्यार्या प्रवशांना याविषयी विचारपूस केली. त्यांनी आपली बॅग असल्याची कबुली दिली. बॅगची अधिक तपासणी केली असता यात इंग्रजी दारूच्या एकूण ३८ बॉटल आढळून आल्यात. ज्याची किंमत ही ८८,५०० रुपये आहे. त्यानंतर दारूसह तीन आरोपींना आरपीएफ ठाण्यात आणून त्यांना पुढील कारवाई करण्याकरिता राज्य अबकारी विभागाला (Excise Department) सुपूर्द करण्यात आले.