– प्रापर्टी डेव्हलपर्स रविंद्र कुडवे हत्याकांड प्रकरण
– जिल्हा सत्र न्यायालयात आज होणार सुनावणी
नागपूर (Nagpur) : शहरातील बहुचर्चित प्रॉपर्टी डेव्हलपर्स (property developers) रविंद्र कुडवे (Ravindra Kudve) हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी प्रेयसीने (Absconding accused girlfriend) अटकपुर्वी जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. (District and Sessions Court) तिच्यावर रविंद्रला बेदम मारहाणीसह अंडकोष ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. या जामीन अर्जावर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे सदर प्रकरणाचा तपास हुडकेश्वर पोलिसांकडून सुरु आहे. प्रियंका (बदललेले नाव) असे २७ वर्षीय आरोपी प्रेयसीचे नाव आहे. तर रविंद्र पंडीत कुडवे (५२) रा. ३७, शामनगर, हुडकेश्वर असे हत्या झालेल्या प्रापर्टी डेव्हलपर्सचे नाव आहे. पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जाते.
घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर,पोलिसांची घटनास्थळाकडे धाव
सदर प्रकरण पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल (Commissioner of Police Ravindra Singal) यांनी गंभीरतेने घेतल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांच्या (Hudkeshwar Police) तपासाला वेग आला, हे विशेष. रविंद्र कुडवे ग्रीन होम डेव्हलपर्स (Green Home Developers) नावाने भागीदारीत भुखंड विक्रीचा व्यवसाय करायचे. १९ एप्रिलला ( 19 April) रात्री ९ च्या सुमारास उदयनगर,(Udainagar,) तपस्या विद्यालयाजवळ (Near Tapasya Vidyalaya) रस्त्याच्या कडेला रवींद्र यांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. हे अंतर त्यांच्या उदयनगर येथील फ्लॅटपासून १ किलो मिटर असावे. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये हलविला. यावेळी प्राथमिक अहवालात अंडकोष ठेचल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबीयांना दिली.
पैशावरुन उद्भवलेल्या वादात,प्रेयसीने साथीदारांच्या मदतीने केली हत्या.
प्रॉपर्टी डेव्हलपर्स रवींद्र कुडवे, हत्याकांड प्रकरण सुनावणीकडे लक्ष
मृतक रविंद्रच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा बघून आरोपी प्रेयसीसह इतरांवर हत्येचा आरोप केला. प्रेयसीला समवयस्क दुसर्या मुलाशी साक्षगंधासह लग्न करायच होता. यासाठी तिला पैशाची आवश्यकता असल्याने तशी तिने रविंद्रकडे मागणी केली होती. याच पैशावरुन उद्भवलेल्या वादात (dispute over money) प्रेयसीने साथीदारांच्या मदतीने हत्या करुन मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी प्रेयसीवर हत्येचा गुन्हा दाखल केला. (case of murder was filed against the girlfriend) तेव्हापासून ती फरार असल्याने पोलिसांच्या तपासात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलिसांचे विविध पथके तिच्या मागावर आहे. तर जिल्हा व सत्र न्यायालयात (District and Sessions Court) आरोपीच्या अटकपुर्व जामीन अर्जावर बुधवारी होणार्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.