देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur Crime) : अनैतिक संबंधाच्या संशयातून पती-पत्नीमध्ये नेहमी खटके उडायचे. (Nagpur Crime) शेवटी या भांडणाच्या रागात ३ चिमुकलीचा जीव गेला. सख्या आईने आपल्या तीन वर्षीय चिमुकलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह घेऊन फिरत असतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मुलीच्या हत्येची कबुली देताच पोलिसही हादरले. ही थरारक घटना (MIDC Police) एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत ईलेक्ट्रीक झोन चौक ते अमरनगर मार्गावर दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली.
आवळला गळा, मृतदेह घेऊन पोहचली ठाण्यात
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) आरोपी आईवर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली. रियांशी रामा राऊत (३) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ट्विंकल रामा राऊत (२४), रा. एस ४४, बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी, एमआयडीसी असे आरोपी महिलेचे नाव आहे. ट्विंकल व रामा हे दोघेही २०२० पासून ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहायचे. दोघेही बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी (MIDC Police) एमआयडीसीत काम करतात. त्यांना ५ फेब्रुवारी २०२१ रोजी रियांशी नावाची चिमुकली झाली. परंतु, ट्विंकल आणि रामा हे एकमेकांवर अनैतिक संबंधाचा संशय घ्यायचे. यातूलनच त्यांच्यात नेहमी खटके उडायचे.
अनैतिक संबंधातून पती-पत्नीत उडायचे `खटके’
सोमवारी ट्विंकल आणि रामा दोघेही सकाळी ८ वाजता कंपनीत कामाला गेले. कंपनीतून दुपारी १२ ते ३ दरम्यान रामा बाहेर गेला. ट्विंकलला संशय आल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यामुळे रामा घरी झोपी गेला. ट्विंकल दुपारी ३.३० वाजता आपली चिमुकली रियांशीला घेऊन घराबाहेर पडली. पत्नी आणि चिमुकली घरी दिसत नसल्यामुळे रामाने त्यांचा शोध घेतला. परंतु मायलेकी कुठेच आढळल्या नाहीत. त्यामुळे रामा घरी परत आला. त्यानंतर (MIDC Police) एमआयडीसी पोलिस रामाच्या घरी आले. ते रामाला घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे रामाला चिमुकली रियांशीची हत्या झाल्याचे समजले.
होय मीच गळा दाबून मारले, आईची कबुली
यावेळी रामाने पत्नी ट्विंकलला रियांशीच्या मृत्यूबाबत विचारना केली असता तिने आपणच रियांशीचा इलेक्ट्रिकल झोन चौक ते अमर नगर कडे जाणार्या रोडवर एका झाडाखाली गळा, नाक, तोंड दाबून मारल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी दोघाही पती-पत्नीला एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. येथेही ट्विंकलने रियांशीचा जीव घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे (MIDC Police) एमआयडीसी पोलिसांनी फिर्यादी रामा राऊतच्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी ट्विंकल राऊतला अटक केली.