- – तरुणीला मदतीचे दाखविले प्रलोभन
- – नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूर (Nagpur) : अकोल्याच्या एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने ( Senior Police Inspector) उच्चशिक्षित मुलीला स्पर्धा परीक्षेत मदतीसह आर्थिक प्रलोभन दाखविले व तिच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकावर (Gunpoint) अश्लील चाळे केले. तिला न्यूड फोटो व्हाट्सअपवर पाठविण्यासाठी दबाव टाकत धमकी दिली. या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाली असून प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. धनंजय सायरे वय ५६, (Dhananjay Sayre) रा. धामनगाव, अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस अधिकार्याचे नाव आहे.
- परीक्षा देऊन शिपायाचा पोलीस अधिकारी झाला.
पीडित २२ वर्षीय तरुणी अपर्णा (बदललेले नाव) मूळची अमरावती जिल्ह्यातील (Amravati district) आहे. तिचे वडिलसुद्धा पोलीस खात्यात आहेत. यातून ओळख झाल्याने धनंजयचे नेहमी घरी येणे-जाणे होते. धनंजय हा पोलीस खात्याअंतर्गत परीक्षा देऊन शिपायाचा पोलीस अधिकारी झाला. सध्या तो अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात ठाणेदार आहे. त्याची वाईट नजर आपल्या हवालदार मित्राची मुलगी (अपर्णावर ) पडली. अपर्णाने एम. टेकपर्यंत शिक्षण घेतले असून तिला पोलीस अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी ती सध्या नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करते. अकोल्यातील (Akola) खदान पोलिस ठाण्याचा (Police Station) ठाणेदार धनंजय सायरे याने तिच्याशी मैत्री केली. गेल्या पाच वर्षांपासून दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यादरम्यान, सायरे हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. त्यामुळे त्याने तिला आयफोन भेट दिला. ठाणेदार सायरे (Thanedar Sayre)हा वारंवार नागपुरात येऊन तिला भेटत होता. गेल्या काही दिवसांपासून सायरे हा अपर्णाला व्हॉट्सअपवर (WhatsApp) अश्लील मॅसेज पाठवायला लागला. ‘तू मला न्यूड फोटो पाठव…’ असा मॅसेज करून स्वतःचा नग्न फोटो त्याने तिला पाठवला. त्यामुळे अपर्णाला आश्चर्याचा धक्का बसला. तिने स्वतःचे फोटो पाठविण्यास नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्या सायरेने तिला हॉटेलमध्ये (hotel) भेटायला येण्यास सांगितले. मात्र, तिने भेटायला येण्यास नकार दिला. त्यामुळे सायरे शनिवारी सायंकाळी नागपुरात आला. थेट अपर्णा राहत असलेल्या घरी गेला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत तिच्यावर बळजबरी करायला लागला. तिने नकार देताच तिच्यावर पिस्तूल रोखली आणि अश्लील चाळे करुन भेट दिलेला आयफोनही हिसकावला. त्यानंतर तिला मारहाण केली. शेवटी संतप्त अपर्णाने थेट नंदनवन पोलीस ठाणे गाठले.
- तपासावर प्रश्नचिन्ह
पीआय पाटील यांच्या नेतृत्वातील नंदनवन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील (Police Inspector Patil) यांनी गुन्हा दाखल असलेल्या अशा अतिशय गंभीर प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमास देण्यास नकार दिला. पोलिस जनसंपर्क अधिकार्यांशी संपर्क साधा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रसार माध्यमांना (media) माहिती देणे बंधनकारक नसले तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये. तसेच समाजात जनजागृती व्हावी, महिला, तरुणी सतर्क व्हाव्यात आणि निर्भयपणे तक्रारीसाठी पुढे याव्या, या दृष्टीकोणातून तरी माहिती देणे अपेक्षित होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील पुढील तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.