उपराजधानीत तीन वर्षात ८८८ बाळांचा गर्भातच मृत्यू
नागपूर (Nagpur):- मागील काही वर्षात उपराजधानीत (In the vice capital) बाळांचा गर्भातच मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी परिस्थिती जैसे थे आहे. गत तीन वर्षात ८८८ बाळांचा गर्भातच मृत्यू (888 babies died in the womb in three years) झाला आहे. तर १ ते ६ वर्षे वयोगटातील १ हजारावर मृत्यूची नोंद (1000 deaths recorded between 1 to 6 years of age) झाल्याने राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. तसेही माता व बालसंगोपनाच्या योजना (Maternal and Child Care Schemes) केवळ कागदी घोड्यांचा बाजार बनल्याचे चित्र आहे. कुठलेही गांभीर्य नसल्यानेच माता व बालसंगोपनाच्या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. ही बाब पुरोगामी राज्याच्या प्रतिमेला तडे (Crack the image of a progressive state) देणारी आहे.
१ ते ६ वर्षांच्या १ हजार १८१ बाळांचा मृत्यू
राज्यात दररोज ३४ बाळ मातेच्या गर्भातच दगावत आहे.शहरात गेल्या काही वर्षात. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याचा ढिंडोरा पिटला जात आहे. घोडेबाजारासारख्या अद्ययावत वैद्यकीय संस्था उभ्या राहिल्या आहेत. मेडिकल, मेयोचाही (Medical, also of Mayo) कायापलट होत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात,(At the municipal health center) रुग्णालयातही उत्तम आरोग्य सुविधांचा दावा करण्यात येतो. परंतु माहिती अधिकारात महापालिकेच्या आरोग्य विभाग (Municipal Health Department) व जन्म मृत्यू विभागाने (Birth and Death Department) आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर (RTI activist Abhay Kolarkar) यांना दिलेल्या माहितीतून हे सर्व दावे फोल ठरले आहेत. कोलारकर यांनी १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत मागितलेल्या माहितीच्या आधारे या काळात तब्बल ८८८ बाळांचे मृत्यू गर्भातच झाल्याची बाब पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर १ ते ६ वर्षांच्या १ हजार १८१ बाळांचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षातील ही आकडेवारी धक्का देणारी आहे. बाळांच्या गर्भातच होणार्या अनेक मृत्यूची नोंद होत नसल्याने स्थिती यापेक्षाही भयंकर असण्याची शक्यता आहे.