विदर्भातील पहिला प्रकल्प येत्या २५ जूनपासून लाभ
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur ) आधी चार्जिंग स्टेशननतर इलेक्ट्रिक बस, ( Electric bus ) असे धोरण एसटी महामंडळाचे ( ST Corporation ) आहे. या धोरणानुसार नागपूर विभागातील ई- चार्जिंग स्टेशनचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या १५ जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पूर्णत्वास येणारा हा प्रकल्प विदर्भातील पहिला आहे आठ आगारापैकी इमामबाडा आगारात ई- चार्जिंग स्टेशनची जागा तीन महिन्यापूर्वी निश्चित करण्यात आली होती. ई-बसेसचा पुरवठा लक्षात घेता तातडीने स्टेशनचे काम हाती घेण्यात आले इमामबाडा आगारात ई-बसचे चार्जिंग स्टेशन होणार असल्याने ई-बत्त सेवेचा ताभ भविष्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे, हे निश्चित. हा प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून येत्या पंधरा दिवसात तो सेवेत येण्याची शक्यता आहे. एसटीच्या ताफ्यात शिवाई ही ई-बस दाखल झाल्यानंतर नागपूर विभागाला ( Nagpur Division ) त्या कधी मिळणार याबाबत हुरहूर होती चार्जिंग स्टेशन झाल्यानतर प्रवाशानाई- बसचा आरामदायक प्रवास करता येणार आहे येत्या १० दिवसांत पहिल्या टप्यात २० ई- बसेस मिळणार असून विभागाला एकूण १३५ बसेस सध्या तरी मिळण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
> एकाचवेळी एकूण २६ बस चार्ज होणार
एकाच स्टेशनमध्ये दोन प्लॅटफॉर्म ( Two platforms station ) राहणार आहेत पहिल्या प्लॅटफॉर्मवर १२ बस चार्ज होणार आहेत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर १४ बस चार्जची व्यवस्था असून एकाचवेळी एकूण २६ बस चार्ज होणार आहेत एका बसला चार्जिंगला दोनतास लागतील चार्ज केल्यावर ३०० ते ४०० किमी बस धाक्तील. वर्कशॉप व मेंटेनन्स रुमची व्यवस्था, प्रशासकीय खोलीची व्यवस्था, बस वॉशिंग रॅम्प, ( Washing ramp ) प्रसाधनगृहाची सुविधा, वाहन निरीक्षण गाडी कायम राहणार आहे एका चार्जरकरिता १८० किलोवॅट वीज खर्च होईल. ईव्हीट्रान्स कफ्नीकडून काम करण्यात येत आहे. १२ वर्षापर्यंत देखभाल दुरुस्तीचा करार आहे.
१३५ ई-बसेस मिळणार
इमामवाडाई चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वास असून जवळपास १० ते १५ दिवसात ते पूर्ण होईल. त्यापूर्वीच नागपूर विभागाला सध्या १२५ बसेस मिळेल त्यात नंतर पुन्हा वाढ होण्याची शक्यता.