- वाठोडा येथे नवीन चार्जिंग स्टेशन
नागपूर (Nagpur) : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle in Maharashtra) धोरणाची अंमलबजावणी सुरू असून इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वृद्धी करण्यावर भर देण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) ‘आपली बस’ सेवेत १४४ बसेस दाखल झाल्या आहेत. सद्यःस्थितीत यापैकी १०२ बसेसची नोंदणी झाली असून जून महिन्यात सर्वच म्हणजे १४४ बसेस नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. नवीन इलेक्ट्रिक बसेससाठी वाठोडा येथे नवीन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येत आहे, अशी माहिती मनपा परिवहन विभागाचे व्यवस्थापक महेश धामेचा यांनी दिली. मनपाने शहर बस ताफ्यातील डिझेलवर धावणार्या बसेसची संख्या कमी करून पर्यावरणपूरक अशा विद्युत बसेस चालविण्याचे धोरण स्वीकारले आहे. इलेक्ट्रिक बसेससाठी मनपाने मे. इव्ही ट्रान्स प्रा. लिमिटेडशी करार (EV Trans Pvt. Agreement with Ltd)केला आहे. त्यानुसार कंपनीने २०२१ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत ४० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे.
– १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १४३ वातानुकूलित बसेस खरेदी
याशिवाय मनपाला नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने १५ इलेक्ट्रिक मिडी बसेस दिल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १४३ वातानुकूलित बसेस खरेदी करण्याचा करारनामा (Agreement) पीएमआय या विद्युत बसेस निर्मिती करणार्या कंपनीशी डिसेंबर २०२२ मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार मे महिन्यात मनपाला १४४ इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या आहेत. सद्यःस्थितीत १०२ बसेसची नोंदणी झाली असून जून महिन्यात सर्वच बसेस नागपूरच्या रस्त्यांवर धावताना दिसतील व नागरिकांना सेवा देतील, असेही धामेचा यांनी सांगितले. वाठोडा (wathoda) येथील १० एकर परिसरातील अद्ययावत नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे शहर बस ताफ्यातील नवीन इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगची व्यवस्था या ठिकाणी होईल. एक बस चार्ज करण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो. बस पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ती ३०० किलोमीटर धावते.
०००००