– मेट्रोमध्ये नोकरीच्या नावाखाली घातला गंडा
– आईने मुलासाठी गहाण ठेवले मंगळसूत्र
– आरोपीला अटक करण्याऐवजी तक्रार अर्ज प्रलंबित ठेवला.
नागपूर (Nagpur) – एका महाठगाने मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचा नावाखाली अनेक बेरोजगारांची आर्थिक फसवणूक केली. (financial fraud) एवढेच नव्हे तर त्याने शहरातील एका आमदाराच्या (MLA) राजमुद्रा असलेल्या लेटरहेडचा (Letterhead with royal seal) शिफारस पत्रासाठी वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यातील एका पीडित युवकाच्या आईने मुलाला नोकरी लागेल, या आशेने चक्क गळ्यातील मंगळसूत्र गहाण (Mangalsutra in the neck) ठेवले होते. परंतु, बालपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या पीडित मुलाला नोकरी न लागल्याने चिंतेत असलेल्या आईचा एकेदिवशी डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. शेवटी त्या पीडित युवकाने अजनी पोलिसांकडे तक्रार केली. (Complaint to Ajani Police) परंतु अजनी पोलिसांनी वेळीच फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याऐवजी तक्रार अर्ज प्रलंबित ठेवला. त्यामुळे पीडित युवकाची न्यायासाठी धडपड सुरू आहे.
१ लाख ५० हजार रुपयाची मागणी केली.
अक्षय सुभाष नगराळे, (Akshay Subhash Nagarle,) रा. श्रमिकनगर, परसोडी खापरी असे पीडित फिर्यादी युवकाचे नाव आहे. रूपेश शेंडे, रा. जोगीनगर, शताब्दी चौक, रिंग रोड असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अक्षयचा एक लहान भाऊ भन्ते आहे. तो परसोडी येथील विहारात भन्ते धम्मनंद यांच्या सोबत राहतो. धार्मिक कार्यानिमित्त भन्ते धम्मानंद यांची आरोपी रूपेश शेंडेसोबत (Accused Rupesh Shende) ओळख झाली. रूपेश हा मेट्रो रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षक (Security Guard in Metro Rail) आहे. यावेळी त्याने मेट्रोमध्ये जागा खाली असून कुणी ओळखतील असल्यास मला सांगा. त्याला कमी पैशात येथे नोकरीवर लावून देईल, असे म्हटले. त्यामुळे भन्ते धम्मानंद यांनी अक्षयचे नाव सुचवले असता १ लाख ५० हजार रुपयाची मागणी केली. अक्षयच्या आईने अंगावरील सोने गहाण ठेवून धम्मानंद यांच्या समक्ष जोगीनगर येथे रूपेशला त्याच्या घरी ५० हजार रुपये दिले.
१० एप्रिल २०२४ रोजी नोकरीच्या नावावर फसवणूक केल्याची लेखी तक्रार केली.
त्यानंतर शेवटी फिर्यादी अक्षयने आपली अजनी पोलिसांकडे १० एप्रिल २०२४ रोजी नोकरीच्या नावावर फसवणूक (Fraud in the name of employment) केल्याची लेखी तक्रार केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी आरोपीला अभय दिल्याचा आरोप आहे. याप्रकारे शहरात नोकर्या मिळवून देण्याच्या नावाखाली रॅकेट सक्रिय आहे. आरोपींविरोधात तक्रार केल्यानंतरही कारवाई केली जात नसल्याचे हे उदाहरण आहे.
३० हजारांचा धनादेश बाऊन्स
एके दिवशी अक्षयला दीक्षाभूमीजवळील मेट्रो रेल्वेच्या ऑफिसला (Metro Railway Office near Dikshabhumi) बोलाविले. यावेळी आरोपी रूपेशने अक्षयच्या नोकरीसाठी मेट्रोच्या नावाने एका आमदाराचे शिफारस पत्र तयार करून आणले होते. ते अक्षयला १९ जून २३ ला मेट्रो ऑफिसमध्ये देण्यास सांगितले. त्यानुसार आधी अर्ज आणि नंतर आमदारांचे शिफारस पत्र (Letter of recommendation from MLA) देऊनही रूपेशने मेट्रोमध्ये नोकरी लावून न देता ५० हजार रुपयाने फसवणूक केली. त्यामुळे ५० हजार रुपये परत मागितले असता ३० हजाराचा भन्ते धम्मानंद यांच्या नावे धनादेश दिला. मात्र हा धनादेश बँकेत न वाटता बाउन्स झाला. उलट आरोपीने पाहून घेण्याची धमकी दिली. यावरून आमदाराचे राजमुद्रा प्रिंट असलेले लेटरहेड आरोपी रूपेश यांनी बनावट तयार केले असावे, असा संशय आहे.