पुरात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कृटुंबीयाला चार लाखांची मदत
नागपूर (Nagpur flood ) : अतिवृष्टीमुळे नागनदीच्या पुरात वाहून गेलेल्या मृतकाच्या कुटुंबीयास शासनातर्पेâ चार लाखांची आर्थिक मदत धनादेशाद्वारे तहसीलदार संतोष खांडरे यांनी मृतकाची पत्नी चंदा भोजराज पटले यांना सुपूर्द केली. आमदार कृष्णा खोपडे यांच्याद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयाला आर्थिक मदतीबाबत पाठपुरावा करण्यात आला होता.
पूर्व नागपुरातील श्यामनगर, पुनापूर पारडी निवासी स्व. भोजराज दुलीचंद पटले २० जुलै रोजी वाहनाने जात होते. दरम्यान पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. आ. कृष्णा खोपडे यांनी जिल्हाधिकारी यांना ३ ऑगस्टला पत्र देन मृतकाच्या कुटुंबियांना मदतीची मागणी केली. जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी तात्काळ अधिकार्यांना कार्यवाही करण्याचे आदेश देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मृतकाच्या घरी जावून पत्नी चंदा भोजराज पटले यांना चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आ. कृष्णा खोपडे, तहसीलदार संतोष खांडरे, माजी नगरसेवक दीपक वाडीभस्मे, वैशाली वै, विजय हजारे, देवेंद्र बिसेन, प्रवीण निशाणकर, भोला वाठ, अशोक शिवहरे, पोमेश हजारे, राकेश नागोसे, अनिकेत पटले, बैस, चव्हाण इत्यादी उपस्थित होते.