- हायकोर्टाला उन्हाळी सुट्ट्या जाहीर ९ जूनपर्यंत कोर्ट बंद राहणार
नागपूर (Nagpur ) :- मुंबई उच्च न्यायालयाला दरवर्षी उन्हाळी सुट्या जाहीर होतात. यंदाही हायकोर्टाला (High Court) उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे ९ जूनपर्यंत कोर्ट बंद राहणार आहे. या काळात खटले प्रलंबित राहू नयेत आणि लोकांची अडचण होऊ नये म्हणून सुटीकालीन न्यायालय सुरू असणार आहे. द्विसदस्यीय खंडपीठ (A two-judge bench) तसेच एकल पीठासमोर उच्च न्यायालयात दिवाणी व फौजदारी (Civil and Criminal) खटल्यांवर सुनावणी घेण्यात येत असून सुटीकालीन न्यायालयामुळे आपत्कालीन खटले निकाली काढण्यास मदत होत आहे. उच्च न्यायालयाला दरवर्षी मे महिना, दिवाळी (Diwali) तसेच ख्रिसमसची (Christmas) सुटी असते. ही परंपरा इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. या कालावधीत उच्च न्यायालयातील (High Court) सर्व कोर्ट रूमचे कामकाज बंद असते. तसेच काम करणारे न्यायमूर्ती,(judge,) सरकारी वकील (Public Prosecutor) व इतर कर्मचारी (employees ) वर्गदेखील काही प्रमाणात सुटीवर जातात. या कालावधीत मात्र अनेक तातडीची दिवाणी तसेच फौजदारी प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला येतात. त्यासाठी सुटीकालीन न्यायालय सुरू करण्यात आले आहे. सुटीकालीन न्यायालयात फौजदारी तसेच दिवाणी प्रकरणांवर सुनावणी घेतली जाते. जामीन अर्ज, रिट याचिका, जनहित याचिका खंडपीठासमोर सुनावणीला येतात. त्यामध्ये जामीन, अंतरिम जामीन, गर्भपातासाठी परवानगी, वैयक्तिक दावे, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अशा विविध प्रकरणांवर सुनावणी घेतली जाते.
रंगीबेरंगी कोट आणि सुनावणी
उच्च न्यायालयात एरवी काळा कोट, (black coat,) त्यावर काळा गाऊन अन् पांढरा टाय असा पोशाख न्यायमूर्ती तसेच वकिलांचा असतो. सुटीकालीन न्यायालय सुरू असल्याने न्यायमूर्ती तसेच वकील नियमित कोटऐवजी इतर रंगाचे कोट घालून येतात. त्यामुळे न्यायालयाची पांढरी काळी रंगसंगती सुटी काळात रंगीबेरंगी दिसून येते.
- न्यायमूर्ती-वकिलांचा समोरासमोर युक्तिवाद
उच्च न्यायालयात न्यायमूर्ती हे नियमित सुनावणीला वकिलांपासून विशिष्ट अंतरावर आणि उंच डायसवर (व्यासपीठ) बसतात, तर वकील उभे राहून युक्तिवाद करतात. मात्र सुटीकालीन न्यायालयात युक्तिवाद करणारे वकील आणि न्यायमूर्ती समोरासमोर बसतात आणि युक्तिवाद करतात. त्या दोघांच्या मध्ये केवळ टेबलाचे अंतर असते.
– ब्रिटिशांच्या सोईची सिस्टीम
अनेकांच्या मते कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या ही ब्रिटिशांनी आपल्या सोईसाठी लागू केलेली पद्धत आहे
– “ही पद्धत बनवली इंग्रजांनी.
उन्हाळ्यात इंग्रज न्यायाधीश एकतर थंड हवेच्या ठिकाणी जायचे नाहीतर इंग्लंडला. स्वातंत्र्यानंतर काहीही विचार न करता आपण तीच पद्धत पुढे चालू ठेवली.