• दुय्यम पोलिस निरीक्षक ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी बढती
• आरोपीवर कडक कलम ३०४ ऐवजी लावले होते `३०४ अ’
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर ( Nagpur ) :- पुण्यातील एका अल्पवयीन मद्यधुंद तरुणाने भरधाव कारने दोघांना चिरडून ठार केल्याप्रकरणाची देशभरात चर्चा आहे. अशीच `हिट अॅण्ड रन’ची (`Hit and Run’) घटना फेब्रुवारीमध्ये नागपुरात ( Nagpur in February ) घडली होती. या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाला होता. मात्र आरोपी कार चालक महिला (accused car driver is a woman ) ही उच्चभ्रू कुटुंबातील असल्यामुुळे तिला लगेच जामीन मिळाला होता. यासाठी तहसील पोलिसांनी ( Tehsil Police ) प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचा आरोप होता. असे असूनही येथील वरिष्ठ पीआय संदीप बुवा हे आजही पोलिस ठाण्यात `दटून’ असल्याने त्यांना आशीर्वाद कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, पीआय बुवा यांनी `हिट अॅण्ड रन’ प्रकरणी भादंवि कलम ३०४ (Section 304) ऐवजी कमकुवत असे कलम `३०४ अ’ ( Section `304 a ) लावल्याने कार चालक आरोपी महिलेला त्याचा फायदा झाला आणि तिला लगेच जामीन मिळाला होता. यापूर्वी पीआय बुवा हे बेलतरोडी पोलिस ठाण्यात दुय्यम पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून कार्यरत होते. येथील त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. दरम्यान एका बिल्डरशी (builder) संगणमत करून त्यांनी प्लॉट खाली करून देण्याचा विडा उचलला होता. यासाठी कायद्याचा दंडुक्याचा गैरवापर करीत त्यांनी एका लकवाग्रस्त प्लॉटधारकासह दूध विक्रेत्याला अक्षरश: छळले. यातील एका पीडिताने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीसुद्धा हे प्रकरण गंभीरतेने घेतले होते. शेवटी त्यांनी हा तपास अन्यत्र सोपविला होता.
• या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाला होता.
२६ जुलै २०२३ रोजी बुवा यांची तहसील पोलिस ठाण्यात ( Tehsil Police Station ) दुय्यम पोलिस निरीक्षक (गुन्हे) पदी बदली झाली. दरम्यान येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांचा नागपुरातील सेवा कालावधी संपला. त्यामुळे पाटील यांनी बदली होताच ३ फेब्रुवारी २०२४ ला आपला चार्ज दुय्यम पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्याकडे सोपविला. तेव्हापासून बुवा हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुवा यांच्याच कार्यकाळात फेब्रुवारी महिन्यात `हिट अॅण्ड रन’ची घटना घडली. या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपी कार चालक महिला ही उच्चभ्रू कुटुंबातील असल्याचे समोर आले. त्यामुळे तहसील पोलिसांनी आरोपी कार चालक महिलेवर कडक असे भादंवि कलम ३०४ न लावता कमकुवत कलम `३०४ अ’ लावून मोकळे झाले होते. याचा फायदा आरोपी कार चालक महिलेला झाला आणि तिला लगेच जामीन मिळाला. जेव्हा की, कार चालक महिला व एक अन्य महिला, या दोघीही मद्य प्राशन करून होत्या. घटनास्थळावरून मद्यपी महिला पोलिसांसमोर पसार झाल्या होत्या. अशा गंभीर प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्यावर मात्र आजवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पीआय बुवा यांना आशीर्वाद कुणाचा असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
• अखेर आरोपी कार चालक रितीका मालूचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला
घटनेंनंतर तहसील पोलिसांच्या प्रतापाविषयी जनमानसात प्रचंड रोष होता. शेवटी त्यांनी सारवासावर करीत गुन्ह्यात कलम वाढ करून भादंवि ३०४ लावले. शेवटी वाढता जनतेचा दबाव लक्षात घेता पोलिसांनी जामीन रद्द करण्यासाठी धडपड सुरू केली. अखेर दाखल गुन्ह्यात भादवि कलम ३०४ ची वाढ होताच शुक्रवारी आरोपी कार चालक महिला रितीका मालू हिचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार जाणता राजा लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुरेश भूषण दडवे व त्याच्या सहकार्यामुळे घटना पुढे आली, हे विशेष.