“वीराआंस नागपूर महानगर व जिल्हा कार्यकारिणीत निर्धार” १० ऑगस्ट ला विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवणार
स्वतंत्र विदर्भाच्या योग्य निर्णय घेतला नाही तर
नागपूर (nagpur ) :- गेल्या ११९ वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी विविध व्यासपीठावर मागणी करून आणि १२ वर्षापासून सतत अनेक जनआंदोलने करून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे. आता विदर्भ राज्य आंदोलन समिती दिनांक १० ऑगस्ट २०२४ ला (९ ऑगस्टच्या क्रांतीदिनानिमीत्य) नागपूर येथील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा (independent Vidarbha state) ध्वज फडकवणार आहे याकरीता नागपूर जिल्हा व महानगर कार्यकारिणीची बैठक आज दि. १ ऑगस्ट ला पूर्व विदर्भ विभागाचे अध्यक्ष अरुण केदार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार निवास सभागृह, नागपूर येथे पार पडली. केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजप सह अनेक पक्षांनी विरोधी पक्षात असतांना स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात तर सहभाग घेतला, मात्र सत्तेवर येताच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याऐवजी वैदर्भिय जनतेच्या तोंडाला पाने पुसली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आपले वचन न पाळलेल्या केंद्रात व राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षाला विदर्भातील जनतेने विदर्भातील लोकांची दिशाभूल केल्याबद्दल जरब बसविली आहे. आता सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य दिले नाही तर आगामी काळात विधानसभा निवडणूकीत विदर्भातील जनता याचे चोख उत्तर देणार आहेत.
आगामी काळात विधानसभा निवडणूकीत विदर्भातील जनता मतपेटीतून उत्तर देणार
यावेळी बैठकीला संबोधित करताना अरुण केदार (Arun Kedar) यांनी सांगितले की, २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याचे लिखित आश्वासन देऊनही आजपर्यंत विदर्भाचे राज्य निर्माण केले नाही, म्हणून बीजेपी ला विदर्भातून हद्दपार व्हावे लागले. तसेच विदर्भात शिवसेना शिंदे गटाचे खाते सुद्धा उघडू शकले नाही. नव्या सरकारने जर विदर्भाचे राज्य त्वरित निर्माण केले नाही तर विदर्भाची जनता भाजपला विदर्भात चारी मुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही. “अबकी बार विदर्भ की सरकार” चा (Abaki Bar Vidarbha Ki Govt) नारा हा जनतेपुढे न्यावा व विदर्भाचे आंदोलन अधिक तीव्र करून विधानसभा निवडणुकीत जो विदर्भ कि बात करेगा वही विदर्भ पे राज करेगा चा संदेशजनमनात रुजवावा व प्रस्थापित विदर्भद्रोही पक्षांना धडा शिकवण्यास भाग पाडावे व नागपूरला राजधानीचे गतवैभव परत प्राप्त करून देण्याकरिता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंदोलन अधिक तीव्र करावे. या आंदोलना दरम्यान केंद्र सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करण्यात यावी, अतिवृष्टीने झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, साप चावून मरणाऱ्या व्यक्तीस इतर वन्यजीवा प्रमाणेच मदत मिळावी, राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पिक विमाधारक शेतकऱ्यांना तात्काळ पिकविम्याची मदत देण्यात यावी, विदर्भात स्मार्ट प्रीपेड मीटर कुठेही लावू नये या ज्वलंत मागण्या करण्यात येणार आहेत.
यशवंत स्टेडियम ते विधानभवन पर्यंत लॉन्ग मार्च
या अनुषंगाने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आणि विदर्भातील नागरिकांवरील अन्याय संपविण्याच्या दृष्टीने नव्या केंद्र सरकार ला इशारा देण्यासाठी “महाराष्ट्रवादी चले जाओ” चा नारा देत समिती पुन्हा रणशिंग फुंकणार आहे. कुठल्याही परिस्थितीत १० ऑगस्ट २०२४ ला विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर येथे “विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झंडा फडकविणारचं” असा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनापूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे १० ऑगस्ट ला दुपारी १२ वाजता एकत्र येणार असून त्यानंतर समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवन (संविधान चौक) पर्यंत लाँगमार्च द्वारे जाऊन विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकविणार आहेत.
यावेळी बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर,शहराध्यक्ष नरेश निमजे, कोर कमेटी सदस्य डॉ. जि. एस. ख्वाजा, डॉ. रमेशकुमार गजबे, अशोक पाटील, श्रीकांत दौलतकर, नागपूर विभागीय महिला आघाडी अध्यक्षा रेखा निमजे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुधा पावडे, रमेश पिसे, प्रशांत नखाते, राजेंद्र सतई, किशोर कुर्वे, ज्योती खांडेकर, आशा वानखेडे, नीलिमा सेलूकर, विना भोयर, एड. मृणाल मोरे, वंदना भगत, सुहासिनी खडसे, अश्विनी मुंजे, मेघा माथुरकर, सुनैना बोबडे, गुलाबराव धांडे, प्रशांत जयकुमार, रवींद्र भामोडे, नौशाद हुसैन, वसंतराव वैद्य, अशोक पटले, संजय चौधरी, महेंद्र सातपुते, अभिजित बोबडे, लक्ष्मण धेंडवाल, विजय मौदेकर, मधुकर झटाले, अशोक देवगिरकर, चंद्रकांत रंभाडे, पुंडलिक ढोणे, भोजराज सरोदे, विद्याधर खानोरकर, तारेश दुरुगकर, रमेश वरुडकर, सुरज मिश्रा, गंगाधर मुंडकर, सतीश शेंद्रे, रुपेश भोयर, अनुभव जैन, कर्नल सिंह दिघवा, गजानन मारुडकर, श्रीराम वाघुलकर, रीतेश जांभूळकर, आनंदराव ठमके, रामेश्वर मोहबे, हरीश राऊत, विठ्ठलराव मानेकर, अभिजित बोबडे, प्रशांत तागडे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.