गडचिरोलीच्या जीवनगट्टाचा गोला नागपुरकरांच्या पसंतीला
नागपूर (Nagpur ) कोकणातल्या देवगडच्या हापूस आंब्याची (Hapus mangoes) सर्वत्र चर्चा होते. त्याच तोडीचा गडचिरोली जिल्ह्यातील जीवनगट्टा (Jeevan Gatta) गावच्या ‘गोला’ हा देशी आंबा (‘Gola’ mango) असून नागपुरकरांच्या पसंतीला आंबा मिलेट धान्य महोत्सवात ठेवण्यात आला आहे. यात खान्देशच्या ज्वारीच्या (sorghum of Khandesh) लाह्यापासून वर्धा नागपूर जिल्ह्यातील (Wardha in Nagpur district) केसर, दशेरी ते सफेदापर्यंतची वैविधता ही ‘आंबा मिलेट धान्य (‘Mango millet grain) महोत्सवाचे’ वैशिष्टय ठरले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन (Maharashtra Agricultural Marketing) मंडळामार्फत शेतकर्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने येथील कुसूमताई वानखेडे भवन (Kusumtai Wankhede Bhavan) येथे १६ पासून सुरू झालेल्या आंबा मिलेट धान्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
आंबा मिलेट धान्य महोत्सवाला उदंड प्रतिसाद
गडचिरोलीच्या जीवनगट्टा गावातील कृषी पदवी संपादन करणार्या प्रणाली गावडे हिने आपल्या कौशल्यावर वैविध्यपूर्ण आंबाडी, टोमॅटो, लसून लोणच्यासह गावातील देशी गोला आंब्याला (Desi gola mango) हापूसच्या रांगेत आत्मविश्वासाने बसविले आहे. ‘माझ्या गावची मी पहिलीच महिला (First woman ) कृषी पदविधारक (agriculture graduate) होत आहे. आईने स्थापन केलेल्या आदिवासी महिला बचत गटाला (Tribal women’s self-help group)आता कृषी शिक्षणाची (Agricultural Education) जोड देवून मूल्यवृद्धी कशी करता येईल याचा मी प्रयत्न करीत आहे. आदिवासी महिलांकडून पारंपारिक चालत आलेल्या कौशल्यावर आधारित अन्न प्रक्रियेला आता थोडे शास्त्रोक्त प्रक्रियेची जोड देऊन नैसर्गिक स्वरुपातच आंबाडी, टोमॅटो यांचे लोणचे, आवळा प्रक्रिया केलेले सिरप, मँगो ज्यूस असे मोजके उत्पादने घेऊन स्टॉल घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रणाली गावडे हिने दिली.
वरुडच्या प्रशांत वेखंडे या शेतकर्याने आपल्या शेतात पिकविलेले दशेरी, लड्डू, लंगडा, सफेदा, चौसा
ही नैसर्गिकरित्या पिकविलेले आंबे
या उपक्रमातून एक नवा आत्मविश्वास मी अनुभवत असून तो आमच्या जीवनगट्टा मधील इतर महिलांपर्यंत घेऊन जाईल असा विश्वास प्रणालीने दाखविला. रानभाज्यांसह इतर उत्पादने तिने विक्रीला ठेवली आहेत.
या महोत्सवात एकूण ५७ स्टॉल्स आहेत. यातील २५ स्टॉल्स आंब्याचे (25 stalls of mangoes) आहेत व ३२ स्टॉल्स मिलेट (32 Stalls Millet) धान्य पदार्थाचे आहेत. वरुडच्या प्रशांत वेखंडे या शेतकर्याने आपल्या शेतात पिकविलेले दशेरी, लड्डू, लंगडा, सफेदा, चौसा ही नैसर्गिकरित्या पिकविलेले आंबे विक्रीस ठेवले आहेत. अनेक महिलांनी आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहेत. ज्वारी बाजरी, नाचनी, वरई, राळा आदि मिलेट धान्यापासून तयार केलेले विविध प्रकार, बिस्किट, पापड, हळद, गावरान तेजा मिरची व लोणचे या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत. हा महोत्सव नॉर्थ अंबाझरी मार्गावरील कुसूमताई वानखेडे सभागृह येथे १९ मे पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खूला आहे.