भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वात बुधवार, १५ मे पासून मेडिकलच्या आवारात बेमुदत धरणे
नागपूर (Nagpur): मेडिकलमध्ये कंत्राटी कर्मचार्यांचा (Contract Staff in Medical) बरेच दिवसांपासून आर्थिक व मानसिक छळ (Financial and mental harassment) सुरू आहे. किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे तसेच नव्याने चतुर्थश्रेणी कर्मचारी (Class IV staff) पदभरतीत संधी उपलब्ध करून देण्यात यावी या मागण्यांसाठी मेडिकलच्या कंत्राटी कर्मचार्यांनी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वात (Under the leadership of Bharatiya Mazdoor Sangh) बुधवार, १५ मे पासून मेडिकलच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन (Indefinite dharna protest in the medical premises) करण्याचा इशारा देण्यात आला आहे., अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
कर्मचार्यांना आजपर्यंत ९४ लाख रुपये कमी देण्यात आल्याचे आढळून आले
सध्या कर्मचार्यांना केवळ १० हजार १८८ रुपये मासिक वेतन देण्यात येत आहे. तथापी हे वेतन अभिजीत इन्टेलिजेन्सी सेक्युरिटी (Abhijeet Intelligence Security) नागपूरतर्पे कमी देण्यात येत आहे. हे किमान वेतन कायद्यापेक्षा खूप कमी आहे. सहाय्यक कामगार आयुक्त (Assistant Labor Commissioner) उ.सु.लोया यांनी मेडिकलमध्ये प्रत्यक्ष येऊन याबाबत प्रत्यक्ष शहनिशा केली. त्यात कर्मचार्यांना आजपर्यंत ९४ लाख रुपये कमी देण्यात आल्याचे आढळून आले. या कर्मचार्यांना २०१८ पासून दर सहा महिन्यांची मुदतवाढ देन त्यांच्याकडून काम घेण्यात येत आहे. महागाईच्या काळात अत्यंत कमी वेतन देऊन कंत्राटी कर्मचार्यांचे शोषण करण्यात येत असल्याचा आरोपही पत्रपरिषदेत करण्यात आला. मेडिकलमध्ये या कंत्राटी कर्मचार्यांना रिक्त जागांमध्ये सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.