४२१ मेडिकल स्टोर्सला कारणे दाखवा नोटीस
८८ परवाने कायमस्वरूपी रद्द.
८८ परवाने कायमस्वरूपी रद्द.
देशोचती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur) :- मेडिकल स्टोअर्समध्ये होणाऱ्या या सर्व व्यवहारांवर अन्न व औषधी विभागाची (Department of Medicine) नजर असतानाच नियमांचे उल्लंघन करणारे विभागाच्या नजरेतून सुटणे अशक्य असते. कारवाईचा दणका बसलेले अनेक मेडिकल स्टोअर्स (Medical stores ) शहरात आहेत. सर्वाधिक प्रकरणे प्रेग्नन्सी किटची (Pregnancy kit) अधिक दरात अनधिकृत ( Unauthorized ) विक्री, परवान्याशिवाय औषधांचा साठा बाळगणे, बोगस डॉक्टर, ( bogus doctor ) प्रिस्क्रप्शनशिवाय औषध विक्री, बिल न देणे, रजिस्टरवर नोंदी न ठेवणे फार्मसिस्टच्या अनुपस्थितीत औषध विक्री, नशेसाठी उपयोगात येणा-या औषधांची प्रिस्क्रप्शनशिवाय विक्रीची आहेत. अव व औषध विभागाने गत ३ वर्षांमध्ये मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करीत एकूण १,७५,१५,३८९ रुपयांचा औषधांचा स्टॉक जप्त केला विभागाकडून गत ३ वर्षानध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच ४२१ प्रतिष्ठानांना नोटीस बजावण्यात आली आहे. ३८३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर ४८ परवाने रद्द करण्यात आले आहेत. याच प्रमाणे अनधिकृतपणे करणाऱ्या अनेक व्यसाय मेडिकल स्टोअर्सचालकांविरुद्ध ( Business against medical ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषधांच्या नोंदी ठेवणे आवश्यक नियमानुसार मेडिकल स्टोअर चालवण्यासाठी फार्मसीशी संबंधित परवाना आवश्यक आहे.
स्टोअर्समध्ये मेडिकल फार्मासिस्ट ( Medical Pharmacist ) हजर असणे आवश्यक आहे. परंतु, अनेक वेळा स्टोअरचालक नोकरांवर जबाबदारी टाकून दुकान सोडून जातात. याशिवाय ग्राहकांना औषधांची बिले न देणे, रजिस्टरवर योग्य नोंदणी न ठेवणे, तपासणीदरम्यान एक्सपायरी डेटची औषधे आढळणे, स्वच्छतेचा अभाव, औषधांच्या खरेदी विक्रीच्या नोंदीत तफावत आदी कारणावरून विक्रेत्याला नोटीस देऊन उत्तर मागविले जाते. अनेक प्रतिष्ठानांमध्ये अनियमितता औषध विक्रीसंदर्भात अनेक नियम आहेत. पण, इम्मकडे दुर्लक्ष होते. अनियमितता आढळत असेने विभागाकडून अधिक गांभीर्याने कारवाई केली जाते आहे. गत ३ वर्षामध्ये काही स्टोअर्समधून निकृष्ट औषधांचाही स्टॉक जप्त ( Stock of medicines ) करण्यात आला आहे. एका प्रकरणात १,३६,०३२ रुपये, अन्य प्रकरणात ३९,३०,२०० रुपये, २०.७५७० व १,७१, २८० रुपयांच्या साठ्यासह सर्व मिळून १,२१,५६,९८१ रुपयांचा औषधांचा स्टॉक जप्त करण्यात आला आहे.
१२६ जणांना बजावल्या नोटीस
चालू वर्षात विभागाकडून सुमारे ५३,५८,४०८ रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. ४ मेडिकल स्टोअर्सचालकां विरुद्ध एफआयआर ( FIR against storekeepers ) नोंदविला गेला १२६ जर्णाना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, ११९ परवाने निलंबित तर १७ परवाने रद्द करण्यात आले. यादरम्यान ३५५ औषधीचे नमुने घेण्यात आले. त्यातील १६ नमुने मानकानुसार नसल्याचे स्पष्ट झाले असून १६ नमुन्यांची तपासणी सुरू आहे.