मेट्रोतील अखेर ‘त्या’ सुरक्षा रक्षकाचे निलंबन
नोकरी लावून देण्याचे दिले होते आमिष
नागपूर (Nagpur) – मेट्रोत (metro) नोकरी लावून देण्याचे खोटे (Lies about employment) अमिष दाखवत पैसे घेणार्या सुरक्षा रक्षकाला निलंबित केले आहे. रूपेश शेंडे नावाच्या या सुरक्षा रक्षकाने (security guard named Rupesh Shende) अक्षय नगराळे (Akshay Nagarle) नावाच्या आपल्या नातेवाईकाकडून मेट्रोत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ५०,००० रुपये घेतले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अक्षय नगराळे याने अजनी पोलिस ठाण्यात (Ajani Police Station) यासंबंधी तक्रार केली होती. या संपूर्ण प्रकरणाची मेट्रोच्या अधिकार्यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश
आऊट सोर्सिंग एजन्सीला दिले. (outsourcing agency) एजन्सी रूपेश शेंडेचे या प्रकरणासंबंधी बयान नोंदवले. कबुलीजबाब देत रूपेश शेंडेने अक्षय नगराळेकडून पैसे घेतल्याचे मान्य केले. (Accepted taking the money) रूपेशने कबुलीजबाब दिल्यावर आऊट सोर्स एजन्सीने त्याला निलंबित केले. पैशांची मागणी करीत महामेट्रोत नोकरी लावून देण्याचे आमिष दिले जाण्याचे प्रकार शहरात होत असून नागपूर मेट्रोने या संबंधित नागरिकांना सातत्याने सतर्क केले आहे. अशा कुठल्याही पद्धतीने नागपूर मेट्रोत नोकरी मिळत नसून याबद्दल नोकरीकरिता प्रयत्न करणार्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन नागपूर मेट्रो करीत आहे. आजवर या संबंधाने शहराच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंददेखील झाली आहे.
आमिषाला बळी पडू नका
मेट्रोतर्पे (Metro) पदभरती होत असताना त्या संबंधीची सर्व माहिती महामेट्रोच्या वेबसाईटवर व प्रतिष्ठित (website of Mahametro and reputed) वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केल्या जाते. त्यामुळे पदभरतीसंबंधी कुठलीही माहिती मिळाल्यास याची संपूर्ण शहानिशा महा मेट्रोची ऑफिशीयल वेबसाईट (संकेत स्थळ) किंवा मेट्रो भवन कार्यालयातून करावी, असे आवाहन महा मेट्रोतर्पेâ नागरिकांना केले जात आहे.