नागपूर (Swachata Hich Seva) : नागपूर महानगरपालिका केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या, स्वच्छता आणि संस्कार या संकल्पनेवर आधारित “स्वच्छता हीच सेवा” (Swachata Hich Seva) या मोहिमेला चालना देण्यासाठी सोमलवार मराठी माध्यम शाळा, स्कूल ऑफ स्कॉलर्स, नारायणम विद्यालय येथे विध्यार्थ्यांच्या मनात, वर्तनात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वच्छतेचे धडे देण्यात आले.
‘स्वच्छ भारत मिशन’ (Swachh Bharat Mission) अंतर्गत कार्यरत असलेल्या रोटरी क्लबशी निगडीत सदस्य प्रतीक्षा मॅडम आणि मधुरा मॅडम यांनी सर्व स्वच्छता वॉरियर्सना महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘माय पॉकेट माय बिन’ बद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, “जर तुम्ही कचरा निर्माण करत असाल तर, जेव्हा डस्टबिन उपलब्ध नसेल तेव्हा, कचरा आपल्या खिशात किंवा बॅगमध्ये ठेवा आणि जेव्हा डस्टबिन उपलब्ध असेल, तेव्हा त्याचा वापर करा”. यासोबतच कचऱ्याचे वर्गीकरण आणि एकेरी वापराच्या प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही समजावून सांगण्यात आले.
महानगरपालिकेद्वारा शाळांमध्ये माय पॉकेट माय बिनचे फलक लावण्यात आले आणि “स्वच्छता हीच सेवा” (Swachata Hich Seva) मोहिमेशी संबंधित होर्डिंग्ज लावण्यात आली. जेणेकरून विद्यार्थी चित्र दृश्याद्वारे ‘स्वच्छ भारत मिशन’शी स्वतःला जोडू शकतील. स्वच्छतेचा हा धडा नागपूर शहराला स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल स्थानी आणण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. ‘स्वच्छता हीच सेवा’ (Swachata Hich Seva) अभियानांतर्गत नागपूर शहरातील सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता योद्ध्यांची जबाबदारी देण्यात आली. जे त्यांच्या स्तरावर शहर साफ व स्वच्छ करण्यासाठी योगदान देतील. ही विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिकेसह शहरातील अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत.